२०१७ या वर्षात विवाहबंधनात अडकल्या ‘या’ अभिनेत्री !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 03:24 PM2017-08-18T15:24:50+5:302017-08-18T20:58:56+5:30
२०१७ या वर्षात आतापर्यंत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. काही हिट झाले, तर काही सपशेल अपयशी झाले. त्याचबरोबर या ...
२ १७ या वर्षात आतापर्यंत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. काही हिट झाले, तर काही सपशेल अपयशी झाले. त्याचबरोबर या चित्रपटांमधून काही अभिनेते-अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची छापही सोडली. आज आम्ही अशाच २०१७ या वर्षातील निवडक दहा चित्रपटांमधील एक हटके माहिती तुम्हाला सांगणार आहोत. ‘हटके’ हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे या दहाही चित्रपटांमध्ये अखेरीस अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकताना दाखविण्यात आले आहे.
रनिंग शादी डॉट कॉम
या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू आणि अमित साद ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल केली नव्हती, मात्र तापसीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता चित्रपटाच्या नावातच ‘शादी’ नाव असल्याने तापसीचे लग्न यात दाखविले जाईल याचा अंदाज प्रेक्षकांना अगोदरच होता.
बद्रीनाथ की दुल्हनिया
वरुण धवन आणि आलिया भट्ट यांचा हा तिसरा चित्रपट होता. यापूर्वीचे दोन्ही चित्रपट ज्या पद्धतीने बॉक्स आॅफिसवर हिट ठरले तसाच हाही चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुुपरहिट ठरला. वरुण आणि आलियाच्या जोडीने चित्रपटात चांगलीच धमाल केली. अखेरीस आलिया वरुणसोबत विवाह बंधनात अडकत असल्याचे दाखविण्यात आले.
फिल्लोरी
अनुष्का शर्मा हिच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत हा ‘फिल्लोरी’ हा दुसरा चित्रपट आहे. चित्रपटात अनुष्काने एका नवरीच्या वेशभूषेतील भुताची भूमिका साकारली आहे. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सरासरी कमाई केली असली, तरी अनुष्काला नवरीच्या भूमिकेत बघायला प्रेक्षकांना आवडले हे नक्की.
लाली की शादी में लड्डू दीवाना
अक्षरा हसन यांचा हा दुसरा चित्रपट होता. चित्रपटाच्या कथेत काहीच नावीण्य नसल्याने हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर केव्हा आला अन् गेला हे कळलेच नाही. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सर्वांत मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. परंतु याही चित्रपटात विवाह सोहळा रंगविण्यात आला.
स्वीटी वेड्स एनआरआई
हा चित्रपटदेखील कधी आला अन् कधी गेला हे कळलेच नाही. वास्तविक चित्रपटात एका जुन्या गाण्याचे रिमेक दाखविण्यात आले; परंतु तरीदेखील प्रेक्षकांवर चित्रपटाची जादू बघावयास मिळाली नाही. याही चित्रपटात लग्न सोहळा दाखविण्यात आला.
बहन होगी तेरी
श्रुती हसन आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा एका छोट्याशा शहरातील आहे. एका गल्लीत राहणाºया या दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री फुलते अखेरीस दोघांचे लग्न होते. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नसला तरी, गाणे मात्र हिट ठरले.
मुबारका
काका-पुतण्याची जोडी असलेल्या या चित्रपटाही लग्नाची धांदल दाखविण्यात आले. पहिल्यांदाच एकत्र आलेल्या अनिल कपूर-अर्जुन कपूरची जोडी प्रेक्षकांना चांगली भावली. संपूर्ण चित्रपटच लग्नाच्या अवती-भोवती फिरणारा असल्याने प्रेक्षकांनी तो चांगला एन्जॉय केला.
टॉयलेट : एक प्रेमकथा
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. पत्नी भूमी पेडनेकर हिच्यासाठी घराच्या आवारात एक टॉयलेट बांधण्यासाठी त्याला काय संघर्ष करावा लागतो, याची कथा चित्रपटात दाखविण्यात आली आहे.
बरेली की बर्फी
हा चित्रपट आजच बॉक्स आॅफिसवर रिलीज झाला आहे. आयुष्यमान खुराना, क्रिती सॅनन आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे समीक्षकांकडून चांगले कौतुक केले गेले. चित्रपटात आयुष्यमान आणि राजकुमार राव क्रितीसोबत लग्न करण्यासाठी आतुर असल्याचे दाखविण्यात आले आहे. अखेरीस क्रिती लग्नाच्या बंधनात अडकतानाही दाखविण्यात आली आहे, परंतु ती कोणासोबत लग्न करते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावे लागेल.
जब हॅरी मेट सेजल
शाहरूख खान याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. परंतु बॉक्स आॅफिसवर आपला प्रभाव टाकण्यात हा चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला आहे. याही चित्रपटात अनुष्का आणि शाहरूखचा अखेरीस विवाह दाखविण्यात आला आहे.