‘पाप’च्या अभिनेत्रीची ठाणे पोलिसांनी केली दोन तास कसून चौकशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 09:24 AM2018-04-26T09:24:47+5:302018-04-26T14:54:47+5:30

कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणी ‘पाप’मधील अभिनेत्री उदिता गोस्वामी हिची पोलिसांनी दोन तास कसून चौकशी केली. पोलीस चौकशीत समोर ...

Actress Thane police took two hours to inquire! | ‘पाप’च्या अभिनेत्रीची ठाणे पोलिसांनी केली दोन तास कसून चौकशी!

‘पाप’च्या अभिनेत्रीची ठाणे पोलिसांनी केली दोन तास कसून चौकशी!

googlenewsNext
ल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणी ‘पाप’मधील अभिनेत्री उदिता गोस्वामी हिची पोलिसांनी दोन तास कसून चौकशी केली. पोलीस चौकशीत समोर आले की, उदिताचा पती आणि दिग्दर्शक मोहित सुरी याचे कॉल डिटेल काढण्यात आले होते. तसेच ते उदिताकडे सोपविण्यात आले होते. मात्र उदिताने हे सर्व गुन्हेगारी भावनेतून केले नसल्याचा पोलिसांना संशय नसल्याने त्याचा फायदा उदिताला होण्याची शक्यता आहे. पोलिसांनुसार, उदिताचा पती मोहित सुरी याचे कॉल डिटेल्स वकील रिजवान सिद्दिकीच्या माध्यमातून प्राप्त केले होते. या प्रकारणाचा तपास करीत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन ठाकरे यांच्या मते, ‘तिने (उदिता) आपल्या जबाबात म्हटले की, सिद्दिकी सीडीआर डिटेल्स मिळविण्यात यशस्वी ठरले. तसेच त्यांनी माझ्या पतीच्या विरोधातील प्रकरण भक्कम करण्यासाठी एक फोटोकॉपीही दिली.’ पोलिसांच्या मते, ‘उदिताने आणखीही काही खुलासे केले, परंतु त्याबाबतचा खुलासा लगेचच आम्ही करणार नाहीत.’

गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले की, ‘आम्ही तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. तिने हे मान्य केले की, पती मोहितचे कॉल डिटेल्स काढले होते. जबाबानुसार आम्ही पुढील तपास करीत आहोत. दरम्यान, ठाण्याच्या गुन्हे शाखेकडून याप्रकरणी अगोदरच निर्माती आयशा श्रॉफला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची पत्नी आलिया यांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. एका वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की, रिजवान सिद्दिकी ज्या गुप्तहेराच्या माध्यमातून सीडीआर प्राप्त करीत असे त्यास अटक करण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाचा कसून तपास करीत आहोत. 



दरम्यान, सीडीआर प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ संशयितांना अटक केली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती की, काही गुप्तहेर २० ते ५० हजारांच्या मोबदल्यात कॉल डिटेल्स मिळवून देत आहेत. यामध्ये एका पोलिसासह देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित हिचाही समावेश आहे. सध्या तिला जामीन मिळाला असल्याने ती कारागृहाबाहेर आहे. 

Web Title: Actress Thane police took two hours to inquire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.