एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी झाली होती अवस्था, हातगाडीवर काढावी लागली होती अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 06:30 AM2019-08-22T06:30:00+5:302019-08-22T06:30:02+5:30

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Actress Vimi Life And Struggle, Vimi Death Anniversary | एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी झाली होती अवस्था, हातगाडीवर काढावी लागली होती अंत्ययात्रा

एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी झाली होती अवस्था, हातगाडीवर काढावी लागली होती अंत्ययात्रा

googlenewsNext
ठळक मुद्देविमीच्या शेवटच्या काळात ती प्रचंड दारू प्यायची. एवढेच नव्हे तर पैशांसाठी ती वेश्याव्यवसाय करायला लागली होती असे म्हटले जाते. एवढेच नव्हे तर तिच्या अंत्ययात्रेला केवळ चार-पाच जण उपस्थित होते आणि तिची अंत्ययात्रा एका हातगाडीवरून काढण्यात आली होती.

हमराज या चित्रपटातील विमी तुम्हाला आठवतेय का? विमी ही त्या काळातील अतिशय कॉन्ट्रोव्हर्शल अभिनेत्री होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. विमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यावेळी तिचे लग्न झालेले होते आणि तिला दोन मुलं देखील होती. 

विमीचा जन्म 1943 मधला... तिने संगीताचे धडे गिरवले होते. तिला लहानपणापासूनच नाटकांमध्ये काम करायला आवडायचे. मुंबईतील सोफिया कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतले होते. तिचे लग्न कोलकतामधील शिव अग्रवाल या व्यवसायिकासोबत झाले होते. संगीत दिग्दर्शक रवी आणि विमी हे एकमेकांना ओळखत असल्याने त्यांनीच बी आर चोप्रांसोबत विमीची ओळख करून दिली आणि त्यांनी विमीला पाहाताचक्षणी तिला चित्रपटाची ऑफर दिली. राज कुमार, सुनील दत्त यांसारख्या दिग्गजांसोबत तिला पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. विमीचा हमराज हा पहिलाच चित्रपट चांगलाच गाजला आणि ती स्टार बनली. तिच्या सौंदर्याची, स्टाईलची चांगलीच चर्चा होऊ लागली. तिच्यासोबत काम करण्यासाठी निर्मात्यांची लाईन लागायची. तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे त्याकाळच्या सगळ्या आघाडीच्या मासिकांमध्ये तिचे फोटो छापले जाऊ लागले. ती फिल्मफेअरच्या कव्हरवर देखील झळकली. 

विमीला पैशांची कधीच कमतरता नव्हती. ती पाली हिलमध्ये राहात होती, डिझायनर कपडे घालायची, तिच्याकडे स्पोर्ट्स कार होत्या. तिच्या पतीने तिला नेहमीच प्रत्येक गोष्टीत साथ दिली. केवळ तिने कोणते चित्रपट स्वीकारायचे आणि कोणते नाही याचा निर्णय तो घेऊ लागला होता. याचा तिच्या करियरवर चांगलाच परिणाम होत होता. 1968 ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिचे पती एका चित्रपटाची निर्मिती करणार असून त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत ती असणार आहे. तसेच तिने रंगीला, संदेश आणि अपॉईंटमेंट असे तीन चित्रपट साईन केले आहेत. विमीचे आयुष्य अगदी सुरळीत सुरू होते. पण काहीच वर्षांत तिचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. पती करियरमध्ये सतत हस्तक्षेप करत असल्याने तिने त्यांच्यापासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला. काहीच वर्षांत लोक विमीला विसरून गेले. 22 ऑगस्ट 1977 ला विमीचे निधन झाल्यानंतर कोणत्याच मोठ्या वर्तमानपत्राने याची दखल घेतली नव्हती. केवळ इंडियन एक्सप्रेसने तिच्या अंत्यदर्शनाला तिच्या कुटुंबियातील, मित्रमैत्रिणीतील, बॉलिवूडमधील कोणीच हजेरी लावली नसल्याचे म्हटले होते.

विमीचा शेवटचा काळ अतिशय वाईट होता असे तिचा एक मित्र कृष्णाने लिहिले होते. हमराज नंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. त्याला यश देखील मिळाले. पण तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर चोप्रा यांनी तिला कोणत्याच चित्रपटात घेतले नाही. पण हमराजच्या लोकप्रियतेमुळे तिच्या बातम्या मीडियात येत होत्या, ती फिल्मी पार्ट्यांना देखील हजेरी लावायची. तिने अखेरचे 1974 मध्ये वचन या चित्रपटात काम केले. पण हा चित्रपट पूर्णपणे आपटला होता. याच दरम्यान तिच्या पतीचा आणि तिचा घटस्फोट झाला. ती एका व्यक्तीसोबत राहात होती. पण तो तिला प्रचंड त्रास द्यायचा. तिला प्रचंड कर्ज झाले होते. कर्जामुळे तिची सगळी मालमत्ता विकली गेली. 

विमीच्या शेवटच्या काळात ती प्रचंड दारू प्यायची. एवढेच नव्हे तर पैशांसाठी ती वेश्याव्यवसाय करायला लागली होती असे म्हटले जाते. एवढेच नव्हे तर तिच्या अंत्ययात्रेला केवळ चार-पाच जण उपस्थित होते आणि तिची अंत्ययात्रा एका हातगाडीवरून काढण्यात आली होती.

 

Web Title: Actress Vimi Life And Struggle, Vimi Death Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.