मुलासाठी तब्बल तीस वर्षे पतीचा मार खात होती ‘ही’ अभिनेत्री, तीस वर्षांनंतर दिला घटस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 03:29 PM2017-12-10T15:29:00+5:302017-12-10T20:59:00+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री रती अग्निहोत्री ५७ वर्षांची झाली आहे. १० डिसेंबर १९६० ...
म ानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री रती अग्निहोत्री ५७ वर्षांची झाली आहे. १० डिसेंबर १९६० मध्ये बरेली येथे जन्मलेल्या रतीचे लहानपण चेन्नई येथे गेले. वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच रतीने मॉडलिंग करण्यास सुरुवात केली. रतीला अभिनेत्री बनविण्याचे श्रेय तामिळ दिग्दर्शक भारती राजा यांना दिले जाते. त्यांनी वयाच्या १६व्या वर्षी रतीला ‘पुदिया वरपुकल’ या चित्रपटात रती अग्निहोत्रीला संधी दिली होती. रतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी मुलगा तनुजकरिता तब्बल ३० वर्षे पतीचा अत्याचार सहन करीत होती.’
रती अग्निहोत्रीने आर्किटेक्ट अनिल विरवानीशी लग्न केले होते. २०१५ मध्ये रतीने पतीवर चाकूने मारणे आणि धमकाविल्याचा आरोप केला होता. या अगोदरही रतीने पतीकडून होणाºया अत्याचाराविषयी तक्रार दाखल केली होती. २०१५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रतीने सांगितले होते की, ‘मी खूप काळ पतीकडून होणारा अत्याचार सहन केला. मात्र आता माझ्यातील सहनशिलता संपली आहे. मी आतापर्यंत केवळ मुलामुळे शांत होते. मी त्याला आमच्यातील वादापासून दूर ठेवू इच्छित होते.’ दरम्यान, रतीने ९ फेब्रुवारी १९८५ मध्ये अनिल विरवानीशी लग्न केले होते. तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच २०१५ मध्ये दोघे विभक्त झाले. या दोघांना तनुज विरवानी नावाचा मुलगा असून, त्याचा जन्म १९८६ मध्ये झाला.
साउथच्या बºयाच चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रती अग्निहोत्रीने बॉलिवूडपटांमध्ये काम केले. ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. पुढे रतीने ‘फर्ज और कानून, कुली, तवायफ, हुकूमत’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पुढे तिने चित्रपटातून ब्रेक घेतला. तब्बल १६ वर्षांनंतर २००१ मध्ये रतीने कमबॅक केले. ‘कुछ खट्टी कुछ मिठी’ या चित्रपटात रतीने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली. त्यानंतर ‘यांदे’ आणि ‘देव’ या चित्रपटातही काम केले. रती अग्निहोत्रीने हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी या चित्रपटांमध्ये काम केले.