​विद्या बालनची जागा घेणार ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 02:40 PM2017-01-29T14:40:29+5:302017-01-29T23:35:58+5:30

लेखिका कमला दास यांच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिके साठी अभिनेत्री विद्या बालनची निवड झाली होती. मात्र अचानक तिने कोणतेही कारण ...

Actress will take Vidya Balan's place? | ​विद्या बालनची जागा घेणार ही अभिनेत्री?

​विद्या बालनची जागा घेणार ही अभिनेत्री?

googlenewsNext
खिका कमला दास यांच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिके साठी अभिनेत्री विद्या बालनची निवड झाली होती. मात्र अचानक तिने कोणतेही कारण न देता हा चित्रपट सोडला होता. यामुळे निर्मात्यांना अडचणीचा सामना कारावा लागला होता. मात्र निर्मात्यांची ही अडचण संपुष्टात आली असून अभिनेत्री तब्बूने ही भूमिका करण्याची तयारी दर्शविली आहे. 

पडद्यावर सशक्त महिलांची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री विदय बालन ही केरळच्या दिवंगत कवयित्री कमला दास ऊर्फ कमला सुरैया यांच्यावर आधारित बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. या चित्रपटासाठी विद्याने कमला दास यांच्या आत्मचरित्राचे वाचनही केले होते. या चित्रपटाची शूटिंग सुरू के ल्यानंतर दुसºयाच दिवशी तिने हा चित्रपट कोणतेही कारण न देता सोडला होता. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांसमोर अडचणी आल्या होत्या. चित्रपटाचे शूटिंग थंड बस्त्यात पडले होते. मात्र आता या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे कळते. Read More : ​महिला केंद्रित चित्रपटाची निर्मिती आनंददायी - विद्या बालन



अभिनेत्री तब्बू हिने कमला दास यांची भूमिका साकारण्याची तयारी दर्शविली आहे. तब्बूला ही भूमिका आवडली असून निर्मात्यांशी याबाबत अंतिम बोलणी सुरू आहे. मात्र अद्याप तिने हा चित्रफट साईन केलेला नाही. विद्याने हा चित्रपट सोडल्यावर निर्माते सावधगिरी बाळगत आहेत. तब्बूने मागील काही चित्रपटात महिलांच्या भूमिका ताकदीने उभ्या केल्या आहेत. हैदर, तलवार, दृष्यम व फितूर या चित्रपटात तब्बूने साकारलेल्या भूमिकांसाठी तिची प्रशंसा करण्यात आली आहे. कमला दास यांच्या बायोपिकमधून तिचा सशक्त अभिनय प्रेक्षकांना पहायला मिळेल असे सांगण्यात येत आहे. Read More : मल्टीटॅलेंट १५ बॉलिवूड कलाकार



दुसरीकडे कमला दास यांच्यावरील चित्रपटाची स्क्रिप्ट सहा महिने विद्याकडे होती. दरम्यान ती आजारी असल्याने शूटिंग पुढे ढकलावे लागले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यावर दुसºयाच दिवशी हा चित्रपट सोडला. कमला दास यांचे जीवन वादग्रस्त असल्याने हा चित्रपटही वादग्रस्त ठरू शकतो असा अंदाज लावण्यात येत आहे. आतापर्यंत त्याची प्रचिती आली आहे. 

ALSO READ
​२०१७ सालातील महिला केंद्रित चित्रपट : पाच अभिनेत्रींच्या करिअरसाठी महत्त्वाचे
मेहमूदच्या ‘लाखो मे एक’चा रिमेक होणार : कोण साकारणार मेहमूद

Web Title: Actress will take Vidya Balan's place?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.