सेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीला काढावा लागला पळ, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 11:11 AM2018-04-15T11:11:32+5:302018-04-15T16:41:41+5:30
सध्या सेल्फीची प्रचंड क्रेझ असून, बॉलिवूड कलाकारांसोबत सेल्फी काढणाºयांची संख्या अगणित आहे, असाच काहीसा प्रसंग अभिनेता अरशद वारसी याच्यासोबत घडला.
अ िनेता अरशद वारसीने ‘गोलमाल’ सिरीजमध्ये आपल्या कॉमिक अंदाजाने सर्वांना हसविण्याचे काम केले आहे, तर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिरीजमधील त्याचा सर्किट अंदाज आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘इश्किया’मधील बब्बनच्या भूमिकेनेही त्याने सर्वांचीच वाहवा मिळविली. अशात अरशदचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये तो आपल्या मित्रांसोबत पार्टीमधून बाहेर पडताना दिसत आहे. मात्र त्याचदरम्यान सेल्फीवेड्या चाहत्यांच्या घोळक्यात तो घेरला जातो. यावेळी त्याची पत्नी मारिया गोरेतीदेखील त्याच्यासोबत बघावयास मिळते. व्हिडीओमध्ये सेल्फी चाहत्यांचा असा काही उत्साह असतो की, अरशदची पत्नी मारिया गोरेती लगेचच गर्दीतून बाहेर पडणे पसंत करते. खरं तर मारियाने लगेचच बाहेर होणे योग्यच होते, कारण सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांचा उत्साह एवढा होता की, कोणी तिच्याकडे लक्ष देणेही योग्य समजले नाही.
अरशद वारसी बॉलिवूडमधील त्या कलाकारांपैकी आहे, जो खूपच निवडक भूमिका साकारतो. आगामी काळात तो ‘टोटल धमाल, फ्रॉड सैंया आणि भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटांमध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटांमध्ये तो पुन्हा एकदा कॉमिक अंदाजात बघावयास मिळणार आहे. ‘टोटल धमाल’ त्याच्या धमाल सिरीजचा पुढचा चित्रपट आहे, तर भैयाजी सुपरहिटमध्ये तो अभिनेता सनी देओलसोबत धमाल करताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशातील एका गॅँगस्टरची आहे, ज्याला अभिनेता बनायचे असते.
दरम्यान, अरशद वारसीने त्याच्या करिअरची सुरुवात १९८७ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘काश’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून केली होती. पुढे अरशदने ‘रूप की रानी चोरों का राजा’ (१९९३) या चित्रपटाचे टायटल सॉन्ग कोरिओग्राफ केले होते. अरशदने १९९६ मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. हा चित्रपट महानायक अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड होता. पुढे त्याने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले, परंतु बॉक्स आॅफिसवर ते फारसे यशस्वी ठरले नाहीत. त्यानंतर २००३ मध्ये त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात सर्किटची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने त्याच्या करिअरचा ग्राफ एकदमच उंचविला.