अदा शर्माचा पॉवरपॅक ॲक्शन सिनेमा 'बस्तर' ओटीटीवर होणार प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार नक्षलवादाची रक्तरंजित कहाणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:46 AM2024-05-09T10:46:00+5:302024-05-09T10:46:56+5:30
अदा शर्मा ही तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
अदा शर्मा ही तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. कमी पण प्रभावी काम करणारी अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 'द केरळ स्टोरी' आणि 'बस्तर: द नक्सल स्टोरी'मध्ये दमदार अभिनय करून तिनं प्रेक्षकांची मने जिंकली. सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'बस्तर: द नक्सल स्टोरी' मधील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. जर तुम्ही अदा शर्माचे चाहते असाल आणि तिचा 'बस्तर: द नक्सल स्टोरी' चित्रपट थिएटरमध्ये पाहणं चुकलं असेल, तर तो OTT वर पाहण्याची सुवर्णसंधी आहे.
'बस्तर: द नक्सल स्टोरी' हा सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. IPS नीरजा माधवन (अदा शर्मा) 17 मे रोजी नक्षलवादाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी OTT वर धडकणार आहे. हा सिनेमा ZEE5 वर पाहू शकता. 'बस्तर' हा चित्रपट थिएटरमध्ये 15 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. अदा शर्मा व्यतिरिक्त या चित्रपटात इंदिरा तिवारी, रायमा सेन यांच्यासह इतर काही कलाकार होते.
A sincere officer, and an even badass fighter. Naxalwaad ko jadd se mitane aa rahi hai IPS Neerja Madhavan. #Bastar premieres 17th May, only on #ZEE5. Available in Hindi and Telugu. #BastarOnZEE5pic.twitter.com/NVPH32WOsH
— ZEE5 (@ZEE5India) May 8, 2024
'बस्तर' चित्रपटामध्ये अदा शर्माचा दमदार अभिनय पाहायला मिळतो. 'बस्तर' हा देशात घडत असलेल्या अज्ञात घटनांचा उलगडा करतो. सिनेमा अनेकांना रक्तरंजित वाटू शकेल. विशेष म्हणजे सिनेमामध्ये मराठमोळे अभिनेते किशोर कदम यांचीही झलक पाहायला मिळतेय. राष्ट्रगीत गाताना माणसांच्या कत्तली झालेल्या दृश्यांपासून ते लहान मुलांना जाळण्यापर्यंत, राजकीय व्यक्तींचे गोळीबार आणि निरपराधांना फासावर लटकवण्यापर्यंतच्या अनेक थरारक घटना सिनेमामध्ये दाखवण्यात आल्या आहेत.