OMG!! विद्युत जामवालच्या हिरोईनची ही काय अवस्था? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 15:56 IST2022-07-17T15:54:58+5:302022-07-17T15:56:18+5:30
या अभिनेत्रीचा हा फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. फुटपाथवर भाजीपाला विकणारी ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

OMG!! विद्युत जामवालच्या हिरोईनची ही काय अवस्था? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का
सोशल मीडियावर अनेकदा असे काही फोटो व्हायरल होतात की जे पाहून डोकं फिरायला लागतं. सध्या एका बॉलिवूड अभिनेत्रीचा असाच एक फोटो व्हायरल होतोय. या अभिनेत्रीचा हा फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. फुटपाथवर भाजीपाला विकणारी ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर स्त्यावर भाजी विकताना दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma ) आहे.
अदाचे हे फोटोज तिच्या नवीन चित्रपटातील लूक टेस्टचे आहेत. अदाने अलीकडेच एका हॉलिवूड चित्रपटासाठी ऑडिशन दिली आहे. यासाठीच तिने हा लूक केला होता. आता हा चित्रपट अदाला मिळाला की नाही, सोबतच तिची चित्रपटातील भूमिका काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण हो, या फोटोमुळे अदा अचानक चर्चेत आली आहे. तूर्तास तिचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय.
अदाने 10 वर्षांपूर्वी 2008 साली आलेल्या ‘1920’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर अदाने हम हैं राही कार के आणि हंसी तो फंसी या चित्रपटांमध्ये काम केले. पण हे चित्रपट फार काही कमाल दाखवू शकले नाही. 2017 मध्ये अदा विद्युत जामवालसोबत कमांडो 2 या चित्रपटात झळकली होती. अद्याप अदाला एकही मोठा चित्रपट मिळालेला नाही.
अदा तिच्या ग्लॅमरस फोटो व फिटनेस व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.