Video: लाठीकाठीचा खेळ अन् हनुमान चालीसेचं पठण; अदा शर्माचा खास व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 16:57 IST2024-04-23T16:57:24+5:302024-04-23T16:57:50+5:30
अदा शर्माने हनुमान जयंतीनिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. तुम्हीही बघा (adah sharma)

Video: लाठीकाठीचा खेळ अन् हनुमान चालीसेचं पठण; अदा शर्माचा खास व्हिडीओ व्हायरल
'दे केरळा स्टोरी' फेम अदा शर्मा सध्या चांगलीच चर्चेत असते. अदा सोशल मीडियावर विविध व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अदाच्या व्हिडीओवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. अदा अनेकदा मराठी भाषेत बोलून व्हिडीओ बनवत असते. अशातच अदाचा एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात तिने हनुमान जयंती निमित्त खास व्हिडीओ शेअर केलाय.
अदाने शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळतं की, आज असणाऱ्या हनुमान जयंतीनिमित्त अदा हनुमान चालीसेचं पठण करताना दिसतेय. याचवेळी ती लाठीकाठीचा खेळही करताना दिसतेय. अदा एकदम लक्षपूर्वक लाठीकाठीचा खेळ खेळत असून हनुमान चालीसेचं पठणही करताना दिसतेय. अदाचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर अल्पावधीत व्हायरल झालाय.
अदा शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. २०२३ साली आलेल्या 'द केरळा स्टोरी' सिनेमातून अदा शर्मा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या सिनेमाच्या कथेचं आणि अदाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या 'बस्तर - द नक्सल स्टोरी' सिनेमात अदा शर्मा झळकली. हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला. अदाच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना आतुरता आहे.