Rakhi Sawant : ड्रामा नव्हे, खरंच झालंय राखी सावंत लग्न; अखेर आदिलने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 01:17 PM2023-01-16T13:17:51+5:302023-01-16T13:22:38+5:30
Adil Khan Durrani, Rakhi Sawant : राखी सावंतने आठवडाभरापूर्वी आदिल दुर्रानीबरोबर लग्न केल्याची घोषणा केली होती. आता आदिलने एक पोस्ट शेअर करत लग्नाबद्दल खुलासा केला आहे.
ड्रामा क्वीन राखी सावंतच्या ( Rakhi Sawant)आयुष्यातील ड्रामा संपता संपत नाही. सध्या राखीच्या लग्नाची चर्चा आहे. राखी बिग बॉस मराठी ४ मधून बाहेर पडली आणि अचानक तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झालेत. राखी व तिचा बॉयफ्रेन्ड आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani ) यांनी निकाह केल्याचं समोर येताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पाठोपाठ राखीने आदिलसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केलेत. मी व आदिलने सात महिन्यांपूर्वीच निकाह केल्याचं राखीने स्पष्ट केलं. या लग्नासाठी राखीने धर्मांतर करत आपलं नावही बदललं. पण मग अचानक या लग्नात ट्विस्ट आला.
होय, आदिलने राखीबरोबरच्या लग्नाला दुजोरा देण्यास टाळाटाळ करायला सुरूवात केली. आदिल असं का करतोय, हे कळायला मार्ग नव्हता अन् तिकडे राखी मीडियासमोर रडत सुटली. अगदी माझ्यासोबतच असं का घडतं? माझ्याच आयुष्यात इतकी दु:ख का? असं म्हणत राखी मीडियासमोर ढसाढसा रडली. अखेर आता आदिलने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आदिलने एक पोस्ट शेअर करत लग्नाबद्दल खुलासा केला आहे. त्यात त्याने राखीबरोबर लग्न केल्याची कबुलीही दिली आहे.
आदिलची पोस्ट
आदिलने निकाहचा फोटो पोस्ट करत, राखीसोबतच्या लग्नाची कबुली दिली. या फोटोत राखी व आदिल दोघांच्याही गळ्यात वरमाला आहेत. “अखेर मी एक मोठी घोषणा करत आहे, मी राखीशी लग्न केलंच नाही असं कधीच म्हटलं नव्हतं. पण मला काही गोष्टी हाताळायच्या होत्या म्हणून मी शांत होतो. पण आता राखी आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. (पप्पुडी)”, असे आदिलने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. राखीनेही या पोस्टवर रिॲक्ट केलं आहे. थँक्यू जान... लव्ह यू, असं तिने म्हटलं आहे.
राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. २९ मे २०२२ ला दोघांचा निकाह झाला. २ जुलै २०२२ ला लग्नाचे रजिस्ट्रेशन केलं.