प्रभासचा 'आदिपुरुष' मोडणार बाहुबलीचा रेकॉर्ड? पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:15 PM2023-06-14T15:15:56+5:302023-06-14T15:29:09+5:30

'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. १६ जूनला हा चित्रपट रिलीज होतोय.

Adipurush box office prediction know opening day collection of prabhas kriti sanon om raut starrer film | प्रभासचा 'आदिपुरुष' मोडणार बाहुबलीचा रेकॉर्ड? पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

प्रभासचा 'आदिपुरुष' मोडणार बाहुबलीचा रेकॉर्ड? पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

googlenewsNext

दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. 16 जून रोजी आदिपुरुष प्रेक्षकांच्या भेटीला होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

आदिपुरुषाचे ॲडव्हान्स बुकिंग ११ जूनपासून सुरू झालं आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, ॲडव्हान्स बुकिंग  चित्रपटाने रिलीजपूर्वीच चांगली कमाई केली आहे. पहिल्या वीकेंडसाठी जवळपास 1.50 लाख तिकिटे विकली गेली आहेत, ज्याची रक्कम सुमारे पाच कोटी आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने पाच कोटींची कमाई केली आहे. प्रभास स्टारर 'आदिपुरुष' भारतातील सर्व भाषा आवृत्त्यांसाठी पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करेल असा अंदाज आहे.


प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपटाची चर्चा भारतात आधीपासून चर्चा आहे. यासोबतच परदेशातही या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. हा चित्रपट भारतात 6200 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरतो की नाही हे पाहावे लागेल.

दरम्यान  प्रभास (Prabhas) प्रभू श्रीरामाच्या तर क्रिती सनॉन(Kriti Sanon) सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. तर सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. . हा चित्रपट येत्या १६ जून रोजी रिलीज होणार आहे.   चित्रपट  हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे.


 

Web Title: Adipurush box office prediction know opening day collection of prabhas kriti sanon om raut starrer film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.