'आदिपुरुष' सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; भाजपाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:56 AM2022-10-06T11:56:59+5:302022-10-06T12:00:24+5:30
प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चा 'आदिपुरुष' वादात अडकला आहे. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातही आदिपुरुष प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
Adipurush Trolling: प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चा बहुप्रतिक्षित "आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे. चित्रपटातील व्यक्तीरेखांचा लुक पाहून गदारोळ माजला आहे. यावर आता राजकीय व्यक्तींनीसुद्धा आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातही आदिपुरुष प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. आमदार राम कदम यांनी काही वेळेपूर्वी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलंय, आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्राच्या प्रदर्शित होऊ देणार नाही.आदिपुरुष या चित्रपटात पुन्हा एकदा, चित्रपट निर्मात्यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी देवी-देवतांचा अपमान केला आहे. आमच्या देवी-देवतांचा अपमान करत या लोकांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आलीये फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची'.
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी#देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का
रामकदम यांच्या आधी मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी प्रभासच्या सिनेमातील हनुमानाच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. हनुमानाच्या अंगवस्त्रावरून त्यांनी निषेध केला आहे. त्यांचा दावा आहे की, या सिनेमात हनुमानाला जे अंगवस्त्र परिधान करून दाखवण्यात आले आहे ते चमड्याचे आहे. सिनेमा निर्मात्यांनी ही दृश्य काढून टाकावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला.