Adipurush Controversy : "उलट मला या गोष्टीचं....",आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 11:04 AM2022-10-05T11:04:51+5:302022-10-05T11:10:08+5:30

आदिपुरुषच्या टीझरच्या ट्रोलिंगवर चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने प्रतिक्रिया दिली आहे.

Adipurush controversy director Om Raut breaks silence on teaser trolling Prabhas Saif Ali Khan look vfx | Adipurush Controversy : "उलट मला या गोष्टीचं....",आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतनं सोडलं मौन

Adipurush Controversy : "उलट मला या गोष्टीचं....",आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतनं सोडलं मौन

googlenewsNext

Adipurush Trolling:  प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चा बहुप्रतिक्षित "आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे. टीझर रिलीज झाल्यापासून निर्मात्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटातील प्रभास आणि सैफ अली खानचा लूक ट्रोल होत आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या VFXवरुन सोशल मीडिया यूजर्सनी चित्रपटाला वाईट पद्धतीने ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटीझन्स चित्रपटातील VFX आणि सैफच्या पात्रावरुन निर्मात्यांना धारेवर धरत आहेत. आदिपुरुषच्या टीझरच्या ट्रोलिंगवर चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एका मुलाखतीत याबद्दल बोलला आणि सांगितले की मला ट्रोलिंगबद्दल आश्चर्य वाटत नाही.

मीडियासाठी ‘आदिपुरुष’च्या थ्रीडी टीझरचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी दिग्दर्शक ओम राऊतही उपस्थित होता. ओम राऊतनं स्क्रिनिंगदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत चित्रपटाच्या ट्रोलिंगबाबत आपलं मत मांडलं. तसेच चित्रपटाबाबत आपलं मत मांडण्यासाठी घाई करत असल्याचंही त्यांनं म्हटलं. .

‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रतिक्रिया पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? असा प्रश्न ओम राऊतला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, लोक टीझर पाहून या चित्रपटाबाबत ज्यापद्धतीनं व्यक्त होतायेत याबाबत मला आश्चर्य वाटलं नाही. उलट मला या गोष्टीचं वाईट वाटलं. हा सिनेमा मी सिल्वर स्क्रिनवर पाहण्यासाठी बनवला आहे मोबाईलवर पाहण्यासाठी नाही. युट्यूबवर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित न करण्याचा पर्याय जर माझ्याकडे असता तर आज ‘आदिपुरुष’चा टीझर त्यावर प्रदर्शित झालाच नसता. पण सध्या युट्यूब म्हणजे काळाची गरज आहे.”


चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आपली बाजू मांडली आहे. आदिपुरुष 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार हे त्याचे निर्माते आहेत.  आदिपुरुष 2D, IMAX 3D आणि 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Adipurush controversy director Om Raut breaks silence on teaser trolling Prabhas Saif Ali Khan look vfx

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.