'थिएटरमध्ये हनुमानाला हेच दाखवणार का?' विभीषणाच्या पत्नीच्या दृष्याने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 03:16 PM2023-06-19T15:16:23+5:302023-06-19T15:17:15+5:30
Adipurush Controversial Scene: 'आदिपुरुष' चित्रपटातील एका सीनवरुन भाजप नेते कपिल मिश्रा यांनी संताप व्यक्त केला आहे.
Adipurush Movie : प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपट 16 जून रोजी रिलीज झाला. पण, चित्रपटातील दृष्य आणि संवादामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाला अतिशय वाईट रिव्ह्यू मिळाले आहेत. चित्रपटातील संवादामुळे लेखक मनोज मुंतशिर आणि वाईट दृष्यांमुळे दिग्दर्शक ओम राऊतवर टीका होत आहे. यातच आता आणखी एका सीनमुळे नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
चित्रपटात रावणाचा भाऊ विभीषणाच्या पत्नीचे एक दृष्य आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर नेटीझन्स संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडिया यूजर्स या दृश्यावर टीका करत असून भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या वादग्रस्त दृश्याचा फोटो शेअर करताना कपिल मिश्रा म्हणाले की, "थिएटरमध्ये हनुमानाला हेच दाखवणार का?"
हनुमान जी को थिएटर में बिठाकर ये दिखाना ? pic.twitter.com/wYMP7Ags4a
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) June 19, 2023
चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या वेळी निर्मात्यांनी प्रत्येक थिएटर मालकाला हनुमानासाठी एक सीट रिकामे ठेवण्याचे आवाहन केले होते. निर्मात्यांच्या या पाऊलाची जोरदार चर्चा झाली होती. आता कपिल मिश्रा यांनी याच मुद्द्यावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.
This is still from #Adipurush/#आदिपुरुष. She is playing role of #Vibhishan's wife.
— Anshuman Singh (Harsh) (@AnshumanSinghHa) June 19, 2023
Rise Of Saffronism😞#HanumanJi is being made for watch such scenes in #Cinema Halls.#Ramayan#Prabhas𓃵#KritiSanon#SaifAliKhan#BycottBollywood#OmRaut#ManojMuntashirShukla#BanAdipurushMoviepic.twitter.com/fmumFTpy4G
विभीषणच्या पत्नीची भूमिका कोणी केली ?
आदिपुरुषमध्ये विभीषणच्या पत्नी सरमाची भूमिका अभिनेत्री तृप्ती तोरडमलने केली आहे. तृप्तीच्या एका सीनवर गदारोळ झाला. तृप्ती कपडे बदलतानाचे दृश्य आहे. दरम्यान, तृप्ती एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. आदिपुरुष हा त्याचा बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट आहे. तिचे वडील मधुकर तोरडमल हेदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत.