Adipurush: सीतेसंदर्भातील 'तो' डायलॉग वगळला, नंतरच 'आदिपुरुष' नेपाळमध्ये झळकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:15 AM2023-06-16T10:15:30+5:302023-06-16T10:17:07+5:30
'आदिपुरुष'चा तो डायलॉग ज्याला नेपाळने केला होता विरोध
ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित, प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा आज प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सिनेमाचा टीझर रिलीज झाला तेव्हाच रावणाचा लुक असो किंवा गंडलेलं व्हीएफएक्स यामुळे टीझर खूपच ट्रोल झाला. नंतर ओम राऊत यांनी चुका दुरुस्त करुन सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला जो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पण तुम्हाला माहितीये का सिनेमातील क्रिती सेननचा एक डायलॉग वगळण्यात आला आहे. यामुळेच सिनेमा नेपाळमध्ये प्रदर्शित होऊ शकला आहे. त्या डायलॉगचा नेपाळशी काय संबंध जाऊन घ्या.
आदिपुरुषचा जेव्हा भारतात विरोध होत होता तेव्हाच नेपाळमध्येही याचा विरोध सुरु केला गेला. काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटी चे मेयर बालेन शाह यांनी १५ जून रोजी घोषणा केली की आदिपुरुष मधील सीतेच्या जन्मस्थानाबाबत केलेला उल्लेख यात सुधारणा केली नाही तर नेपाळमध्ये कोणत्याही भारतीय सिनेमाचं स्क्रीनिंग होणार नाही.
बालेन शाह यांनी दिला तीन दिवसांचा वेळ
बालेन शाह यांनी नेपाळी भाषेत ट्वीट करत लिहिले,'जोपर्यंत साऊथ इंडियन फिल्म आदिपुरुष मध्ये असलेला 'जानकी भारत की बेटी है' हा डायलॉग केवळ नेपाळमध्येच नाही तर भारतातही दाखवला जाऊ नये. फिल्ममधून डायलॉग काढण्यात यावा तोपर्यंत काठमांडू महानगर पालिकामध्ये कोणत्याही भारतीय सिनेमाचं प्रदर्शन केलं जाणार नाही. ही सुधारणा करायला ३ दिवसांचा वेळ देत आहोत. सीता माता की जय!'
नेपाळ सेन्सर बोर्डाने देखील आदिपुरुषच्या रिलीजचा निर्णय राखून ठेवला. फिल्मच्या ट्रेलरमध्येच सीता माता भारत की बेटी असल्याचा डायलॉग दाखवण्यात आला. रामायणानुसार सीता मातेचा जन्म नेपाळच्या जनकपूरमध्ये झाला. श्रीरामाशी लग्न झाल्यानंतर सीता माता भारतात आली.
एकंदर या विवादानंतर मेकर्सने हा डायलॉग हटवला आहे. यानंतरच नेपाळ सेन्सॉर बोर्डाने फिल्म पास केली आहे. आदिपुरुष आज रिलीज झाला असून प्रभास, क्रिती सेनन, देवदत्त नागे, सनी सिंह आणि सैफ अली खान यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे.