Adipurush: 'आदिपुरुष' झाला पायरसीचा शिकार, रिलीजनंतर काही तासांत ऑनलाईन लीक, निर्मात्यांना बसला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 14:48 IST2023-06-16T14:35:15+5:302023-06-16T14:48:13+5:30
प्रभास आणि क्रिती सनॉनचा चित्रपट पायरसीचा बळी ठरला आहे.

Adipurush: 'आदिपुरुष' झाला पायरसीचा शिकार, रिलीजनंतर काही तासांत ऑनलाईन लीक, निर्मात्यांना बसला मोठा धक्का
रामायणावर आधारित प्रभासचा आदिपुरुष सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्याप्रमोशनमध्ये आदिपुरुषच्या टीमने कोणतची कसर सोडली नाही. त्यामुळे रिलीज आधी या सिनेमाचे शो ॲडव्हान्स बुकिंगमध्येच हाऊस फुल्ल झाले आहेत. अशातच या सिनेमा दरम्यानची मोठी बातमी समोर येते आहे.
'आदिपुरुष' आज रिलीज झाला असून सिनेमाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र सिनेमाच्या व्हीएफएक्सवरुन प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. सैफ अली खाननेही रावणाच्या भूमिकेत निराश केल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रभास आणि क्रिती सनॉनचा चित्रपट पायरसीचा बळी ठरला आहे. अशा स्थितीत 'आदिपुरुष'च्या कमाईलाही मोठा फटका बसू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास आणि क्रिती सनॉनचा चित्रपट 'आदिपुरुष' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही क्षणातच इंटरनेटवर लीक झाला. प्रेक्षक केवळ चित्रपट पाहू शकत नाहीत तर ते विनामूल्य डाउनलोड देखील करू शकतात. 'आदिपुरुष' चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर याचा मोठा फटका बसू शकतो.