Adipurush : 'राघवची भूमिका साकारणं ही एखाद्या...', आदिपुरुषमधील भूमिकेबद्दल स्पष्टच बोलला प्रभास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 02:05 PM2023-06-21T14:05:51+5:302023-06-21T14:06:24+5:30

'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Adipurush: 'Playing the role of Raghav is like a...', Prabhas speaks candidly about his role in Adipurush | Adipurush : 'राघवची भूमिका साकारणं ही एखाद्या...', आदिपुरुषमधील भूमिकेबद्दल स्पष्टच बोलला प्रभास

Adipurush : 'राघवची भूमिका साकारणं ही एखाद्या...', आदिपुरुषमधील भूमिकेबद्दल स्पष्टच बोलला प्रभास

googlenewsNext

'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या संवादांवरून प्रेक्षक चित्रपटातील कलाकारांवर जोरदार निशाणा साधत आहेत. एवढेच नाही तर चित्रपट पाहिल्यानंतर लोक दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करत आहेत. दरम्यान, प्रभास(Prabhas)ने चित्रपटातील राघवच्या भूमिकेबाबतचे त्याचे काही अनुभव शेअर केले आहेत. 

'आदिपुरुष' चित्रपटात अभिनेता प्रभास 'राघव'च्या भूमिकेत दिसला आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक अभिनेत्याला त्याच्या लूकसाठी ट्रोल करत आहेत, तर दुसरीकडे प्रभासचे चाहते चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. 'आदिपुरुष' चित्रपटातील अभिनेत्याची भूमिका पाहून अनेकांना 'बाहुबली'चा प्रभासही आठवत आहे. आता अभिनेत्याने खुलासा केला आहे की राघवची भूमिका करणे त्याच्यासाठी मोठ्या जबाबदारीपेक्षा कमी नव्हते.

ही एखाद्या मोठ्या जबाबदारीपेक्षा कमी नाही

अलीकडेच एका मुलाखतीत प्रभास म्हणाला, 'मला चित्रपटाबद्दल काही शंका होत्या, पण आक्षेप नव्हता. श्रीरामांप्रती लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेता अशा व्यक्तिरेखा साकारणे ही एखाद्या मोठ्या जबाबदारीपेक्षा कमी नाही. ती व्यक्तिरेखा यशस्वी कशी करणार हे सतत मनात घोळत होते, पण चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आणि हळूहळू ही भूमिका साकारण्यात मी बऱ्याच अंशी यशस्वी झालो.

व्यक्तिरेखेसाठी मी खूप मेहनत घेतली

प्रभास पुढे म्हणाला, 'हा चित्रपट भारतीय संस्कृती आणि धर्मात खोलवर रुजलेल्या 'रामायण' या महाकथेवर आधारीत आहे. त्यामुळे या चित्रपटात माझे संपूर्ण लक्ष हे पात्र साकारण्यावर होते ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी श्रीरामाला आतापर्यंत पाहिले आहे. ‘रामायण’ कथा ऐकत आपण सगळेच मोठे झालो आहोत. म्हणूनच या व्यक्तिरेखेसाठी मी जीव तोडून मेहनत घेतली आहे.

चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात
'आदिपुरुष' हा चित्रपट १६ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटात प्रभास राघवच्या भूमिकेत आहे, तर क्रिती सनॉन माता जानकीच्या भूमिकेत आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. यामध्ये रावणाच्या लूकपासून ते हनुमानाच्या संवादापर्यंत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Adipurush: 'Playing the role of Raghav is like a...', Prabhas speaks candidly about his role in Adipurush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.