‘अदिरा’चा फोटो झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 12:42 PM2016-12-09T12:42:42+5:302016-12-09T12:47:12+5:30

‘बेफिक्रे’ दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि ‘मर्दानी’ अभिनेत्री राणी मुखर्जी यांची मुलगी ‘अदिरा’ हिचा क्युट फोटो नुकताच राणीने सोशल मीडियावर ...

'Adira' photo gets viral! | ‘अदिरा’चा फोटो झाला व्हायरल!

‘अदिरा’चा फोटो झाला व्हायरल!

googlenewsNext
ेफिक्रे’ दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि ‘मर्दानी’ अभिनेत्री राणी मुखर्जी यांची मुलगी ‘अदिरा’ हिचा क्युट फोटो नुकताच राणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अदिराच्या जन्मानंतर त्या दोघांनीही तिचा एकही फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. त्यामुळे तिने नुकताच अपलोड केलेला अदिराचा फोटो  चाहत्यांसाठी गोड ट्रिटच असणार आहे. 

                          
                              
२०१४ मध्ये राणी आणि आदित्य हे विवाहबद्ध झाले. मागील वर्षी त्यांच्या स्वप्नातील परी राणीच्या कुशीत होती. अदिराच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त राणीने तिच्या चाहत्यांसाठी एक खास भेट म्हणून आदिराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबतच राणीने एक भावनाविवश करणारे एक पत्रही जोडले आहे. आई होण्याचा अनुभव किती अदभुत असतो हे तिने या पत्रातून व्यक्त केले आहे. आदिरामुळे राणी आणि आदित्यचे आयुष्यच बदलून गेले असे ती म्हणते. पत्राच्या शेवटी ती देवाचे आभार मानते की, तिला आदिरासारखी गोड मुलगी आशीर्वाद म्हणून दिली.  

आज दिग्दर्शक आदित्य चोप्राचा ‘बेफिक्रे’ चित्रपट रिलीज झाला. आदिराच्या जन्माला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याने ‘बेफिक्रे’च्या प्रदर्शनाची तारीखही ९ डिसेंबरच नियोजित केली होती. रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटाकडून आदित्यला खुप अपेक्षा आहेत. मात्र, बॉक्स आॅफिसवर बेफि क्रे किती गल्ला जमवतो हे आता वेळच सांगेल. 

                      

Web Title: 'Adira' photo gets viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.