आदिती राव हैदरीनेही केलीये प्लास्टिक सर्जरी? जुना फोटो पाहून चाहते शॉक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:20 AM2024-05-30T10:20:00+5:302024-05-30T10:20:32+5:30
प्लास्टिक सर्जरी करणं हे आता मनोरंजनसृष्टीत फारच सामान्य गोष्ट झाली आहे
अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या सौंदर्याची नेहमीच स्तुती होत असते. तिचं नॅचरल सौंदर्य चाहत्यांना घायाळ करणारं आहे. आदिती रॉयल कुटुंबातून आली आहे. सध्या आदिती संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमधील तिचा अभिनय, गजगामिनी वॉक सगळ्याचंच खूप कौतुक झालं. पण आता सोशल मीडियावर आदितीलचा जुना फोटो व्हायरल होतोय. यात आदितीला ओळखणंही कठीण झालंय.
प्लास्टिक सर्जरी करणं हे आता मनोरंजनसृष्टीत फारच सामान्य गोष्ट झाली आहे. पण आदिती राव हैदरीनेही प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतलाय यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीए. तिचा जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये आदिवतीने लाल रंगाची साडी नेसली आहे. कपाळावर टिकली आहे. यात आदितीचा चेहरा खूप वेगळा दिसतोय. तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. तिने प्लास्टीक सर्जरी केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
What did she eat😭 pic.twitter.com/dWzKLJxszx
— 𝕏 (@GopeshKhetan) May 29, 2024
आदितीचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकऱ्यांनीही कमेंट केल्या आहेत. 'पैसे असतील तर तुम्हीही काहीही खरेदी करु शकता' अशी कमेंट एकाने केली आहे. तर आदितीलचे काही चाहते नाराज झालेत. 'माझी आवडती होती ती ही पण आता...','केवळ नाकाच्या सर्जरीने तिचा पूर्ण चेहराच बदलला' अशा कमेंट्स आल्या आहेत.
आदिती राव हैदरीने 'दिल्ली 6' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने 'लंडन, पॅरिस टू न्यूयॉर्क','मर्डर 3','वजीर','पद्मावत' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. आदितीने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.