OMG!आदिती राव हैदरी सांगतेय, ऑडिशनला कराव्या लागतात या विचित्र गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 03:16 PM2019-05-20T15:16:20+5:302019-05-20T15:22:31+5:30
आदितीला एका चित्रपटाच्या ऑडिशनच्यावेळेस चक्क इंटिमेंट दृश्य करून दाखवण्यास सांगितले होते.
ऑडिशनला कलाकारांना काय काय करावे लागते हे तुम्हाला कळले तर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण ऑडिशन म्हटले की, एखादे भावुक अथवा कॉमिक दृश्य करून दाखवायचे एवढेच आपल्याला माहीत असते. पण काही चित्रपटांच्या ऑडिशन्सच्यावेळी कलाकारांकडून अतिशय वेगवेगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात असे अभिनेत्री आदिती राव हैदरीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे.
अदितीने सन २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली 6’ मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती. २०१८ मध्ये आलेला ‘दासदेव’ हा तिचा बॉलिवूडमधला अखेरचा चित्रपट होता. सध्या ती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त काम करताना दिसत आहे. तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. तिने तिच्या एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी नुकत्याच मीडियाला मुलाखती दिल्या आहेत. एका मुलाखतीच्या दरम्यान आदितीने एका ऑडिशच्या दरम्यानचा तिला आलेला एक अनुभव सांगितला आहे.
आदितीला एका चित्रपटाच्या ऑडिशनच्यावेळेस चक्क इंटिमेंट दृश्य करून दाखवण्यास सांगितले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले होते. याविषयी आदिती सांगते, मला ऑडिशनमध्ये एका मुलासोबत इंटिमेंट दृश्य करण्यास सांगितले होते. हे दृश्य ज्या मुलासोबत करण्यास सांगितले त्या मुलाला मी ओळखत देखील नव्हते. हे काय सुरू आहे हेच मला कळत नव्हते. तो मुलगा अतिशय उंच होता. तसेच तो खूपच विनम्र होता.
आदितीने यात ज्या मुलाचा उल्लेख केला, तो मुलगा म्हणजे अभिनेता अरुणोदय सिंह असून आदितीच्या दुसऱ्या चित्रपटाच्या म्हणजेच ये साली जिंदगी या चित्रपटाच्या ऑडिशनच्या वेळी ही गोष्ट घडली असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात अरुणोदय आणि आदिती यांनी एकत्र काम केले होते.
आदिती राव हैदरीने आतापर्यंत पद्मावत, रॉकस्टार, मर्डर ३, भूमी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.