कास्टिंग काऊचला विरोध केल्यामुळे अदिती राव हैदरीला करावा लागला होता ह्या गोष्टीचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 06:01 PM2018-07-30T18:01:26+5:302018-07-30T18:02:27+5:30

अदिती राव हैदरीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता आणि आठ महिने तिच्याकडे कामदेखील नव्हते. मात्र तिने खचून न जाता आपली वाटचाल सुरू ठेवली. 

Aditi Rao Hydari Shared her experience against casting couch | कास्टिंग काऊचला विरोध केल्यामुळे अदिती राव हैदरीला करावा लागला होता ह्या गोष्टीचा सामना

कास्टिंग काऊचला विरोध केल्यामुळे अदिती राव हैदरीला करावा लागला होता ह्या गोष्टीचा सामना

googlenewsNext
ठळक मुद्देअदिती कास्टिंग काऊचचा सामना केल्यानंतर झाली खंबीर

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित  'पद्मावत' चित्रपटातील मेहरूनिसाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या कामाचे खूप कौतूक झाले. तिच्या या भूमिकेमुळे तिच्या करियरला कलाटणी मिळाली आहे. सध्या ती मणिरत्नम यांच्या सिनेमात काम करते आहे. तिला बॉलिवूडमध्ये सात वर्षे झाली आहेत. तिचा हा प्रवास खूप सुखकर झाला असेल असे तुम्हाला वाटत असेल ना. पण असे नसून तिलादेखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता आणि आठ महिने तिच्याकडे कामदेखील नव्हते. मात्र तिने खचून न जाता आपली वाटचाल सुरू ठेवली. 

अभिनेत्री अदिती राव हैदरीने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी खुलासा केला. कास्टिंग काऊचचा सामना मीसुद्धा केला आणि त्याविरोधात गेल्याने मला काम गमवावे लागले आणि मी खूप रडले. काम गमावल्याचा मला पश्चाताप नाही पण अशा प्रकारे मिळणारी वागणूक पाहून खूप वाईट वाटते, असे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले व म्हणाली की, ‘कास्टिंग काऊचच्या घटनेनंतर जवळपास आठ महिने कोणतेच काम मिळत नव्हते. पण त्या घटनेनंतर मी खंबीर झाले. २०१३ हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेले, कारण त्याच वर्षी मी माझ्या वडिलांनाही गमावले. पण २०१४ नंतर सर्वकाही पुन्हा व्यवस्थित झाले. काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतर सर्वकाही सुरळीत होते.
अदितीने दाक्षिणात्य चित्रपट 'श्रिनगरम' चित्रपटातून अभिनय क्षेत्रातील करियरला सुरूवात केली होती. 'ये साली जिंदगी' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.
फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येदेखील कास्टिंग काऊचचा मुद्दा चर्चेचा विषय बनला होता. याबाबत स्वरा भास्कर, सरोज खान, दिव्यांका त्रिपाठी यांनी वक्तव्य केले होते.

Web Title: Aditi Rao Hydari Shared her experience against casting couch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.