३२ तास एअरपोर्टवर अडकली, सामानाचा पत्ता नाही, भुकेने कासावीस; आदिती राव हैदरीचा वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:27 PM2024-06-27T13:27:56+5:302024-06-27T13:30:00+5:30
आदिती राव हैदरी तब्बल ३२ तास एअरपोर्टवर अडकली आहे. याशिवाय तिचं सामानही गहाळ झालंय. नेमकं प्रकरण आदितीने सोशल मीडियावर सांगितलंय (aditi rao hydari)
सध्या कलाकार एअरपोर्टवर अडकल्याच्या बातमी समोर येत आहेत. कधी फ्लाईटला उशीर होतो तर कधी काही तांत्रिक कारणास्तव लोकांना मनस्ताप होतो. काही दिवसांपूर्वी राधिका आपटेने याविषयी तक्रार सोशल मीडियावर सांगितली होती. आता असाच त्रासदायक अनुभव आदिती राव हैदरीला आला आहे. आदिती तब्बल ३२ तास एअरपोर्टवर अडकल्याची गोष्ट घडली आहे. भुकेने तिचा जीव कासावीस झालाय. आदितीने ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर सांगितली आहे.
३२ तास एअरपोर्टवर आदिती अडकली, सामानाचा पत्ता नाही
आदिती राव हैदरीने तिच्या सोशल मीडियावर याविषयी सविस्तर खुलासा केलाय. आदिती UK मधील हिथ्रो एअरपोर्टवर अडकल्याची बातमी समोर येतेय. सर्वात वाईट व्यवस्था आणि ढिसाळ नियोजन असं म्हणत आदितीने हिथ्रो विमानतळावरील कारभारावर ताशेरे ओढले आहेत. याशिवाय ३२ तास उलटूनही सामान न मिळल्याने आदिती एअरपोर्टवरच अडकली आहे. एवढा मोठा प्रवास करुन पुन्हा ३२ तास वाट पाहणं हा अनुभव आदितीसाठी मनस्ताप देणारा आहे.
आदितीने एअरपोर्ट अधिकाऱ्यांकडे केली तक्रार
आदितीने याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिथ्रो एअरपोर्ट अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी मोठा मॅसेज करुन हरवलेल्या सामानाची जबाबदारी घेण्याऐवजी हात वर केले. याशिवाय ब्रिटिश एअरलाईन्सशी आदितीला संपर्क साधायला सांगितला.
19 hours and ticking….
— Aditi Rao Hydari (@aditiraohydari) June 26, 2024
Also, @British_Airways
just putting it out there. This isn't my first rodeo with the brits...watch#Heeramandi on @NetflixIndia and you'll know that I'm not one to go down without a fight for justice!
So can you free our bags! ASAP!
I have a conference…
त्यामुळे आदितीने ब्रिटीश एअरवेजला टॅग करुन 'माझं सामान कुठे आहे?' असं विचारलं. एकूणच एअरलाईन्सच्या ढिसाळ कारभाराचा फटका आदितीला पडला आहे. "मला एके ठिकाणी कॉन्फरन्सला जायचं आहे. मला माझ्या सामानाची आवश्यकता आहे. तुमचा शिष्टाचार माझ्या सामानाची पूर्तता करु शकत नाही." अशा शब्दात आदितीने तिचा राग व्यक्त केलाय