आदित्य चोप्रा आपल्या 'वायआरएफ ५०' या भव्य सोहळ्याचा आराखडा चित्रपटगृहांमध्ये करणार जाहीर!
By तेजल गावडे | Published: September 21, 2020 01:52 PM2020-09-21T13:52:34+5:302020-09-21T13:53:26+5:30
थिएटर सुरू झाल्यानंतर आदित्य चोप्रा यशराज फिल्म्सच्या ५० व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने भव्यदिव्य कार्यक्रमाची घोषणा करणार आहे.
यशराज फिल्म्सच्या ५० व्या वर्षपूर्तीचा सोहळा म्हणून काय भव्यदिव्य कार्यक्रम केला जाणार आहे याची घोषणा आदित्य चोप्रा कधी करतात याबद्दल सध्या फार चर्चा रंगली आहे. आता मात्र हिंदी सिनेसृष्टीतील २०२० मधील सर्वात मोठी घोषणा कधी होईल याबद्दल आम्ही एक निश्चित कालमर्याद सांगू शकतो. आम्ही हे खात्रीशीरपणे सांगू शकतो की वायआरएफ प्रोजेक्ट ५० ची घोषणा चित्रपटगृहांमध्ये करायची असं आदित्य चोप्रा यांनी ठरवलं आहे. कारण, लोकांनी पुन्हा सिनेमांकडे वळावं, असं त्यांना मनापासून वाटतंय.
"आदित्य चोप्राचा हा निर्णय फार महत्त्वाचा आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र कोरोना संकटाच्या परिणामांशी लढत आहे. चित्रपटगृहे पुन्हा कधी सुरू होतील याची एक काही तारीख अशी नाही. त्यामुळे आदिने ठरवलंय की तो चित्रपटगृहे सुरू होण्याची वाट पाहील आणि या कार्यक्रमाची रूपरेषा देणारी घोषणा चित्रपटगृहांमध्येच करेल. आदित्य या क्षेत्राला पूर्ण पाठिंबा देतो आणि त्याची इच्छा आहे की सर्वात मोठ्या प्रोडक्शन हाऊसची सर्वात मोठी घोषणा मोठ्या पडद्यावरच व्हावी," असे सूत्रांनी सांगितले.
या सूत्रांनी सांगितल्यानुसार, "आदित्य चोप्राने वायआरएफ प्रोजेक्ट ५० साठी जे जे काही ठरवलंय ते पाहता एक लक्षात येते की यात अनेक सुपरस्टार्स आहेत आणि सिनेमा पाहण्याचा अप्रतिम, आंतरिक अनुभव घेण्यासाठी लोकांनी पुन्हा चित्रपटगृहांमध्ये यावे हे तो सांगू पाहतोय. चित्रपटगृहे हा सिनेसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि वायआरएफचे सिनेमे फक्त मोठ्या पडद्यावर अनुभव घेता यावा यासाठीच बनवले जातात, हे आदि लोकांना सांगू इच्छितो. शिवाय, वायआरएफचा कोणताही सिनेमा डिजिटल येणार नाही, हेसुद्धा यातून सांगायचे आहे. हा खरंतर धोरणात्मकरित्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. कारण, त्यातून सगळ्यांना हे पुन्हा एकदा कळणार आहे की वायआरएफ फक्त मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतील असेच सिनेमे बनवतो."
"देशभरात चित्रपटगृहे सुरू झाली की लगेचच ही महत्त्वाची घोषणा केली जाईल. भारतातील प्रेक्षकांसमोर भव्य कार्यक्रम उलगडून दाखवण्यासाठी आदित्य नक्कीच तितकी भव्य योजना आखेल. हा आराखडा जगभरात चित्रपटगृहांमध्ये सादर होणार आहे म्हणजे नक्कीच ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने ही घोषणा होणार. यासंदर्भात वायआरएफ काय योजना आखत आहे यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. हा कार्यक्रम भव्य असेल आणि बहुचर्चित असेल, हे मात्र नक्की," असे सूत्रांनी सांगितले आहे.