अकाऊंटमध्ये फक्त 18 हजार...! आदित्य नारायणवर आली बाईक विकण्याची वेळ

By रूपाली मुधोळकर | Published: October 15, 2020 12:22 PM2020-10-15T12:22:20+5:302020-10-15T12:27:57+5:30

कोरोना महामारीने ओढवले आर्थिक संकट

aditya narayan has opened up about his financial struggles finished his savings during the lockdown | अकाऊंटमध्ये फक्त 18 हजार...! आदित्य नारायणवर आली बाईक विकण्याची वेळ

अकाऊंटमध्ये फक्त 18 हजार...! आदित्य नारायणवर आली बाईक विकण्याची वेळ

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या आदित्यच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. मी यावर्षाअखेर लग्न करणार असल्याचे स्वत: आदित्यनेच सांगितले आहे.

कोरोना महामारीने सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचे आयुष्य बदलले. आता गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याचेच घ्या. आदित्य सध्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. कोरोना काळात गाठी असलेला सगळा पैसा संपला. आता आदित्यच्या अकाऊंटमध्ये केवळ 18000 रूपये आहेत.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्यने लॉकडाऊन व कोरोनाकाळातील अनुभव शेअर केलेत.

तर बाईक विकावी लागेन...
आदित्यने सांगितले,‘वर्षभर मी काम करणार नाही, असा विचारही केला नव्हता. लॉकडाऊनने माझे सगळे प्लान बदलले. माझे सगळे सेव्हिंग संपलेय. सगळी म्हणजे सगळी. म्युच्युअल फंडमध्ये जे काही पैसे गुंतवले होते, ते सगळे लॉकडाऊन काळात मी काढले. जगण्यासाठी मला हे पैसे काढावे लागलेत. मी बिलिनेअर नाही. आता सेव्हिंगच्या नावावर माझ्या अकाऊंटमध्ये केवळ 18 हजार रूपये आहेत. आता काम नसेल तर माझ्याकडे पैसेच नसतील. कदाचित मला माझी बाईकही विकावी लागेल. हा खरचं कठीण काळ आहे. अशास्थितीत तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात आणि अनेकांच्या मते, हे निर्णय चूक असू शकतात.’

यावर्षाअखेरिस करणार लग्न
सध्या आदित्यच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. मी यावर्षाअखेर लग्न करणार असल्याचे स्वत: आदित्यनेच सांगितले आहे. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुद्द आदित्यने ही माहिती दिली. त्याने सांगितले, ‘मी श्वेताला ‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. आमच्या चांगले बॉन्डिंग झाले आणि हळूहळू ती तिच्या प्रेमात पडलो. सुरुवातीला तिला केवळ मैत्री हवी होती. कारण आम्ही दोघेही वयाने लहान होतो. दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे होते. प्रत्येक नात्याप्रमाणेच आमच्या नात्यातही बरेच चढऊतार आलेत. मात्र आमचे नाते अतूट राहिले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करू शकतो. माझ्या आईवडिलांना श्वेता खूप आवडते.’

पुढे त्याने सांगितले, काही वर्षांपूर्वी माझे व श्वेताचे बे्रकअप झाल्याची चर्चा पसरली होती. यानंतर श्वेतासोबत बाहेर जाणे कठीण झाले होते. नात्यात मतभेद होतात. पण याचा अर्थ नाते संपते, असे नाही. आम्ही दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आता लग्नाची वेळ आलीये, असेही तो म्हणाला. श्वेता व आदित्य गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2010 मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती.

नेहा कक्करपाठोपाठ आदित्य नारायणनेही दिली प्रेमाची कबुली; या अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ  

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगच्या लग्नाला जाणार नाही आदित्य नारायण, समोर आले हे कारण

Web Title: aditya narayan has opened up about his financial struggles finished his savings during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.