लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय, मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्राला देहदान करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:28 IST2024-12-06T15:27:19+5:302024-12-06T15:28:02+5:30
वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय संशोधनात मदत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अभिनेत्यानं म्हटलं आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय, मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्राला देहदान करणार
Aditya Pancholi Announces Body Donation : बॉलिवूडमधील अतिशय देखणा अभिनेता म्हणून आदित्य पंचोली ओळखला जातो. आदित्य हा त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. आदित्य पांचोलीने मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्रात पुर्ण शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 13 डिसेंबर रोजी लायन गोल्ड अवॉर्ड्स (Lions Gold Awards 2024) सोहळ्यात वैद्यकीय शास्त्रासाठी आपला देह दान करण्याचा निर्णय जाहीर करणार आहे.
वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय संशोधनात मदत करण्यासाठी हा इतका मोठा निर्णय घेतल्याचं त्यानं म्हटलं आहे. एबीपी लाइव्हशी बोलताना आदित्य पांचोलीने त्याला प्रेरणा कुठून मिळाली हे सांगितले. आदित्य म्हणाला, 'अभिनेता म्हणून आपण पडद्यावर नायकाची भूमिका करतो पण खरी वीरता ही अशी कामं करण्यात दडलेली असते जेणेकरून आपण समाजाला काहीतरी परत देऊ शकू. शरीर दान करण्याचा माझ्या या निर्णयातून मला आशा आहे की इतरांना यातून प्रेरणा मिळेल. यामुळे मी मृत्यूनंतरही जगासाठी योगदान देत राहू शकेल". त्याच्या या उदात्त निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आदित्य पांचोलीला १९९०मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित 'जख्मी जमीन' या चित्रपटानेओळख मिळवून दिली. यानंतर आदित्य अनेक चित्रपटांमध्ये झळकला. चित्रपटांमध्ये खलनायक बनून आदित्य पंचोलीने प्रसिद्धी मिळवली. 'अव्वल नंबर', 'जंग', 'खिलोना', 'येस बॉस', 'हमेशा' आणि 'ये दिल आशिकाना'मध्ये त्याने साकारलेला 'व्हिलन' अधिक गाजला.आदित्य पांचोलीने त्याच्यापेक्षा तब्बल ६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री झरीना वहाबशी लग्न केलं आहे. मात्र, विवाहित असताना देखील आदित्य पंचोलीचे नाव कंगना राणौतशी जोडले गेले होते.