​आदित्य पांचोलीने नोकराणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याने या अभिनेत्रीने त्याच्यासोबत केले होते ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 10:56 AM2017-11-06T10:56:02+5:302017-11-06T16:26:02+5:30

आदित्य पांचोली आणि कंगना राणौतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. या दोघांचे अनेक वर्षं प्रेमप्रकरण होते. त्यामुळे आदित्य आणि त्याची ...

Aditya Pancholi, who had a relationship with Naushani, had acted with her | ​आदित्य पांचोलीने नोकराणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याने या अभिनेत्रीने त्याच्यासोबत केले होते ब्रेकअप

​आदित्य पांचोलीने नोकराणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याने या अभिनेत्रीने त्याच्यासोबत केले होते ब्रेकअप

googlenewsNext
ित्य पांचोली आणि कंगना राणौतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. या दोघांचे अनेक वर्षं प्रेमप्रकरण होते. त्यामुळे आदित्य आणि त्याची पत्नी जरिना वहाब यांच्यात देखील दुरावा निर्माण झाला होता. कंगनाच्या करियरच्या सुरुवातीला आदित्यने तिला खूपच मदत केली होती. नुकत्याच आप की अदालत या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आदित्यसोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. केवळ कंगनासोबतच नव्हे तर आणखी एका अभिनेत्रीसोबत आदित्य पांचोलीचे प्रेमप्रकरण गाजले होते. आणि या अभिनेत्रीसोबत आदित्य पांचोलीचे ब्रेकअप होण्यामागे एक विचित्र कारण होते. हे कारण काय होते हे तुम्हाला कळल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसणार आहे. 

aditya pancholi pooja bedi

आदित्य पांचोली आणि अभिनेत्री पूजा बेदी यांचे अनेक वर्षं अफेअर होते. ते बॉलिवूडच्या पार्टींना, कोणत्याही समारंभात एकत्र पाहायला मिळत असत. ते अनेक वर्षं नात्यात होते. त्यामुळे ते त्यांच्या रिलेशनशिपबाबत खूप सिरियस असल्याचे सगळ्यांना वाटत होते. पण काहीच वर्षांनी त्या दोघांचे ब्रेक अप झाले. या दोघांचे ब्रेकअप एका वेगळ्याच कारणावरून झाले होते. पूजा आणि आदित्यचे अफेअर सुरू असल्याने पूजाच्या घरी आदित्यचे नेहमीच येणे-जाणे असायचे. पूजाच्या घरी त्यावेळी एक नोकराणी होती. या नोकराणीसोबत आदित्यने शरीरसंबंध ठेवले असल्याचे पूजाला कळल्यामुळे तिने आदित्यसोबत ब्रेकअप केले होते. तिनेच या ब्रेकअपविषयी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिच्या आणि आदित्यच्या ब्रेकअप विषयी सांगितले होते की, आदित्यने माझ्या घरात काम करणाऱ्या नोकराणीसोबत शरीरसंबंध ठेवले होते. ती मुलगी केवळ १५ वर्षांची होती. हे संबंध त्या दोघांच्या मर्जीने ठेवण्यात आले होते हे खरे असल्याने त्याला बलात्कार म्हणता येत नाही. पण ती मुलगी अल्पवयीन असल्याने तो एक बलात्कारच होता असे माझे ठाम मत आहे. पण ही गोष्ट मला कळल्यानंतर मी त्याच्यासोबत लगेचच ब्रेक अप केले होते. 
पूजाने मीडियाला दिलेल्या या मुलाखतीनंतर आदित्य पांचोलीवर बलात्काराचा खटला देखील दाखल करण्यात आला होता. 

Also Read : आदित्य पांचोली सांगतोय कंगना राणौत मला पत्नीसारखीच

Web Title: Aditya Pancholi, who had a relationship with Naushani, had acted with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.