अफेयरच्या चर्चेदरम्यान अनन्या पांडे 'खो गए हम कहां'च्या स्क्रीनिंगला दिसली आदित्य रॉय कपूरसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:25 IST2023-12-19T13:22:43+5:302023-12-19T13:25:06+5:30
आदित्य रॉय कपूर त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड अनन्या पांडेसोबत 'खो गये हम कहाँ' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचला होता.

अफेयरच्या चर्चेदरम्यान अनन्या पांडे 'खो गए हम कहां'च्या स्क्रीनिंगला दिसली आदित्य रॉय कपूरसोबत
आदित्य रॉय कपूर त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड अनन्या पांडेसोबत 'खो गये हम कहाँ' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचला होता. या चित्रपटात पांडेसोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव देखील आहेत. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी एकत्र आले होते. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना आणखी जोर मिळाला आहे.
अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांचा आगामी चित्रपट 'खो गये हम कहाँ' चे स्क्रिनिंग मुंबईत झालं. यावेळी सिद्धांत, आदर्श, अनन्या व्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर, शनाया कपूर, सुहाना खान आणि ओरीसह अनेक स्टार्स उपस्थित होते. या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष एकाच कारमध्ये स्क्रिनिंगला पोहोचलेल्या अनन्या आणि आदित्यकडे लागले होते.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगला आदित्य रॉय कपूर कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता. अनन्या पांडेने क्रॉप टी, मिनी स्कर्ट आणि मोठा ब्लेझरमध्ये दिसली. स्क्रिनिंगनंतर कपल रोमँटिक ड्राईव्हवर गेले. आदित्य-अनन्याच्या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. दोघे लग्नकधी करतायेत असा प्रश्न चाहते विचारतायेत.
'कॉफी विथ करण'मध्ये अनन्याने देखील डेटिंगच्या चर्चांवर भाष्य केलं होतं. "आम्ही चांगले मित्र आहोत", असं अनन्या म्हणाली होती. त्यानंतर अनन्याचा 'कपूर' असा टॅग असलेला टीशर्ट घातलेला व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर अनन्या-आदित्यच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा आदित्यने यावर भाष्य केल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.