आदित्य सील दिसणार निगेटिव्ह भूमिकेत 'ह्या' चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 20:00 IST2018-10-27T12:54:32+5:302018-10-27T20:00:00+5:30
स्टुडंट ऑफ द इयरच्या सिक्वेलमध्ये आदित्य सील निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.

आदित्य सील दिसणार निगेटिव्ह भूमिकेत 'ह्या' चित्रपटात
अभिनेता आदित्य सील नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'नमस्ते इंग्लंड'मध्ये प्रमुख भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात त्याने सॅमची भूमिका साकारली असून ही भूमिका रसिकांना खूप भावली आहे. यानंतर आता तो एका वेगळ्या भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. स्टुडंट ऑफ द इयरच्या सिक्वेलमध्ये तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.
'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशननंतर आदित्यला हा रोल मिळाला आहे. करण जोहरचे दिग्दर्शन असणारा या चित्रपटातून आता आदित्यला नवी ओळख मिळू शकते. याआधी त्याने २००७ मध्ये आलेल्या 'सलाम इंडिया', 'नमस्ते लंडन' आणि २०१४ मध्ये आलेल्या 'पुरानी जीन्स' चित्रपटांमध्येही काम केले आहे. आदित्यने २००२ मध्ये आलेल्या एक छोटी सी लव्ह स्टोरी या चित्रपटातूनच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती.
‘स्टुडंट आॅफ द इयर २’मध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत आहेत, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. २०१२ मध्ये ‘स्टुडंट आॅफ द इयर’ रिलीज झाला होता. तरूणाईने हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता. हा चित्रपट स्वत: करणने दिग्दर्शित केला होता. पण ‘स्टुडंट आॅफ द इयर २’ पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करतोय. पुनीतने याआधी आय हेट लव्ह स्टोरी आणि गोरी तेरे प्यार में सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटातून आदित्य निगेटिव्ह भूमिकेतून रसिकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे कमालीचे ठरेल.