अदनान सामीचा एकदा-दोनदा नाही तर तब्बल चार वेळा झाला निकाह; १५५ किलो वजन घटवून सर्वांना केलं हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:45 AM2023-08-16T09:45:48+5:302023-08-16T09:46:11+5:30
Adnan Sami : अदनान सामी वेट लॉस जर्नीसोबतच त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आला आहे.
सुन जरा, लकी लिप्स, भीगी भीगी रातों में , चोरी चोरी, लिफ्ट करा दे अशा दमदार गाण्यातून रसिकांना भुरळ पाडणारा गायक म्हणजे अदनान सामी (Adnan Sami). अदनान सामी प्रोफेशनल लाइफ शिवाय खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत आला होता. त्याने एकदा-दोनदा नाही तर चार वेळा निकाह केला आहे. इतकंच नाही तर एका तरुणीशी त्याने दोनदा लग्न केले. त्याची मॅरीड लाइफ फार गुंतागुंतीची होती.
अदनान सामीच्या हृदयात जेबा बख्तियारने १९९३ मध्ये स्थान मिळवले होते. याच अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्या हिना या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. अदनान आणि जेबाला एक मुलगा देखील झाला, त्याचे नाव अजान सामी होते. मात्र, लग्नाच्या तीन वर्षानंतर अदनान आणि झेबाचे नाते तुटले. जेबासोबत घटस्फोट घेतल्यानंतर दुबईच्या अरब सबा गलदारीने अदनान सामीच्या आयुष्यात प्रवेश केला. अदनानप्रमाणेच सबाचेही हे दुसरे लग्न होते. दोघांनी एकमेकांना साथ दिली, पण हे नातेही दीड वर्ष चालले.
सबासोबत दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, पण...
सबासोबत विभक्त झाल्यानंतर अदनान सामी जवळपास पाच वर्षे सिंगल राहिला. यानंतर त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला, ज्याने सर्वांना चकित केले. खरं तर, २००८ मध्ये अदनानने पुन्हा एकदा सबा गलदारीला आपले जीवनसाथी बनवले. दोघांनी आपली चूक सुधारली असे चाहत्यांना वाटले, पण पुन्हा एकत्र आलेले हे नातेही अवघ्या एका वर्षानंतर तुटले.
अशा प्रकारे अदनानला 'खरे प्रेम' सापडले
२०१० मध्ये अदनान सामीची रोया सामी खानशी भेट झाली. रोया ही निवृत्त मुत्सद्दी आणि लष्करी जनरल यांची मुलगी आहे. भेटीनंतर काही वेळातच अदनानने रोयाला प्रपोज केले आणि लवकरच दोघांनी लग्न केले. १० मे २०१७ रोजी तिला एक मुलगी झाली, तिचे नाव तिने मदिना सामी खान ठेवले.
१६ महिन्यांत घटवलं १५५ किलो वजन
संगीतासोबतच अदनान सामी त्याच्या लठ्ठपणामुळेही चर्चेत होता. त्यावेळी अदनानचे वजन २३० किलो होते. २००७ मध्ये अचानक अदनान सामीचे नवे रूप सर्वांसमोर आले, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. वास्तविक, अदनान सामीने कठोर परिश्रम करून आपले वजन २३० किलोवरून ७५ किलोपर्यंत कमी केले होते. त्याने १६ महिन्यांत आपले वजन १५५ किलोपर्यंत कमी केले होते.