लता मंगेशकर यांच्या विरोधात बोलणा-यांची अदनान सामीने केली बोलती बंद, वाचा नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 12:11 IST2021-01-15T11:56:17+5:302021-01-15T12:11:56+5:30
यानंतर अदनान सामीनेही एक अत्यंत दुर्मिळ फोटो चाहत्यांसह शेअर केला, फोटोत आशा भोसले आणि नूरजहां लता मंगेशकरसोबत एकत्र पाहायला मिळत आहेत. नुसता फोटोच शेअर केला नाही तर समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.

लता मंगेशकर यांच्या विरोधात बोलणा-यांची अदनान सामीने केली बोलती बंद, वाचा नेमकं काय घडलं?
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावातच सगळं काही आलं. सारी दुनिया गानकोकीळा लतादीदींच्या आवाजावर फिदा आहेत. देशातच नाही तर जगभरात त्यांचे कोट्यवधी फॅन्स आहेत. लता मंगेशकर सोशल मीडियावर सक्रीय असून काही ना काही कारणामुळे ट्रेंड होत असतात. पुन्हा एकदा लता मंगेशकर चर्चेत आल्या आहेत. लता मंगेशकरमुळे अदनान सामी यांचेही चाहते कौतुक करत आहेत.
त्याचे झाले असे की, लता मंगेशकरवर काही लोकं टीकाही करतात तर काही त्यांच्यावर स्तुतीसुमनंही उधळतात. नुकतेच एका ट्विटर युजरने (@ikaveri) लता मंगेशकर यांच्यावर निशाणा साधत लिहीले की, त्यांचा आवाज चांगला आहे हे भारतीयांच्या मनावर पूर्वीपासून बिंबवले गेले आहे.ट्विट शेअर होताच नेटीझन्सह सेलिब्रेटींचेही लक्ष ट्विटने वेधून घेतले. या ट्विटला सुमारे 7,000 लाईक्स मिळाल्या आहेत आणि 1700 लोकांनी रिट्वीट केले आहे. कोणी याचे समर्थन करताना दिसत आहेत तर कोणी निषेधही करताना दिसत आहेत. प्रत्येकजण यावर आपले मत मांडताना दिसत आहेत.
हे ट्विट वाचून गायक अदनान सामीलाही राग आला आणि सोशल मीडियावर ट्विटला जबरदस्त उत्तर दिले, फार काही न बोलता, 'बंदर क्या जाने अदरक का स्वाद... लिहीत ट्विट करणा-यांची बोलतीच बंद केली आहे. आपल्याला यातलं काही कळत नसेल तर आपल्या बुद्धीचा बाजार मांडण्यापेक्षा शांत राहणेच चांगले नाही का? असे लिहीत चांगलेच सुनावले आहे.
What an Iconic & Historic Photo!#LataMangeshkar#NoorJehan#AshaBhosle 💖💖💖@mangeshkarlata@ashabhoslepic.twitter.com/0nMEkFsC0R
— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 14, 2021
यानंतर अदनान सामीनेही एक अत्यंत दुर्मिळ फोटो चाहत्यांसह शेअर केला, फोटोत आशा भोसले आणि नूरजहां लता मंगेशकरसोबत एकत्र पाहायला मिळत आहेत. नुसता फोटोच शेअर केला नाही तर समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.
‘माझा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तेथेच मी वाढलो आणि माझे शिक्षण पूर्ण केले. माझी बायको जर्मनीची आहे; मात्र मी भारत निवडला. कारण माझे हृदय नेहमीच भारत आणि भारतीयांसाठीच धडधडत राहिले आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी एका कार्यक्रमात केले होते.