करो या मरो...; सारा अली खान-सचिन खेडेकरांचा 'ए वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:38 IST2024-03-04T13:36:22+5:302024-03-04T13:38:38+5:30
सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेला 'ए वतन मेरे वतन' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय

करो या मरो...; सारा अली खान-सचिन खेडेकरांचा 'ए वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज
गेल्या अनेक दिवसांपासून सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'ए वतन मेरे वतन' सिनेमाची खुप उत्सुकता होती. काहीच दिवसांपुर्वी निर्माता करण जोहरने जागतिक रेडिओ दिवसानिमित्ताने 'ए वतन मेरे वतन' ची रिलीज डेट जाहीर केली. आता नुकतंच 'ए वतन मेरे वतन' चा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमधून सारा अली खान - सचिन खेडेकर यांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतोय.
'ए वतन मेरे वतन' च्या ट्रेलरमध्ये भारत स्वातंत्र्य होण्यासाठी लढणारी उषा मेहता दिसतात. उषा आणि तिचे सहकारी इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देतात. हा लढा देत असतानाच उषाला एक मोठं साधन सापडतं ते म्हणजे रेडिओ. रेडिओच्या माध्यमातून लोकांना जागरुक करण्याचं काम उषा करते. इंग्रजांना सुगावा लागू न देता उषा पारतंत्र्यात अडकलेल्या भारतीयांना संबोधन करण्याचं काम करते.
''ए वतन मेरे वतन' च्या ट्रेलरमधून सारा अली खान आणि सचिन खेडेकर यांचा जबरदस्त अभिनय दिसतो. याशिवाय 'लापता लेडिज'मधील अभिनेता स्पर्श श्रीवास्तव सिनेमात विशेष भूमिकेत झळकतोय. करण जोहरने सिनेमाची निर्मिती केलीय. २१ मार्चला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.