इस्पेशियल ६ पॅक बँड २.०चे नवं गाणं, सहा विशेष मुलांचा 'पागल' म्युझिक व्हिडीओ लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 08:38 AM2018-05-17T08:38:58+5:302018-05-17T14:08:58+5:30
बॉलिवूडचा गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने नवं गाणं तयार केलं आहे.या गाण्याच्या लॉन्चिंगच्यावेळी विशालनं आपल्या मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.बॉलिवूड सिनेमा आणि गाण्यांच्या माध्यमातून विशेष मुलांविषयीच्या गोष्टी जगासमोर आणल्या पाहिजेत असं मत विशालने यावेळी व्यक्त केले.
क ही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने मुंबईत एका बँडचे लॉन्चिंग केलं. या बँडचे नाव ६ पॅक बँड २.० असे ठेवण्यात आले आहे.या बँडची खासियत म्हणजे हा बँड वेगवेगळ्या प्रकारच्या सहा दिव्यांग मुलांचा आहे.त्यामुळंच या बँडला इस्पेशियल बँड असं म्हटलं गेलं.या बँडने 'झकड पकड' डान्स गाणं सादर करत साऱ्यांची मनं जिंकली. आता याच ६ पॅक बँड २.० चे पागल हे नवे गाणे लॉन्च झाले आहे. दिल तो पागल है या ९० च्या दशकात गाजलेल्या शीर्षक गीताला नव्या रुपात सादर करत या सहा विशेष मुलांनी नवा संदेश दिला आहे.मानसिकदृष्ट्या खचलेल्या मुलांना उभारी देणं आणि या मुलांबाबत समाजाला जागरुक करण्याच्या उद्देशाने या बँडने हे नवं गाणं समोर आणले आहे.बॉलिवूडचा गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने नवं गाणं तयार केलं आहे.या गाण्याच्या लॉन्चिंगच्यावेळी विशालनं आपल्या मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.बॉलिवूड सिनेमा आणि गाण्यांच्या माध्यमातून विशेष मुलांविषयीच्या गोष्टी जगासमोर आणल्या पाहिजेत असं मत विशालने यावेळी व्यक्त केले. सिनेमांमध्ये विशेष मुलांना नकारार्थी किंवा निगेटिव्ह रुपात दाखवलं जातं अशी खंतही त्याने व्यक्त केली.मात्र याचवेळी विशालने तारें जमीं पर या सिनेमाचेही कौतुक केलं. या सिनेमामुळे खरंच काही गोष्टींबाबत जागरुकता झाली असं त्याला वाटतं. सिनेमाचं संगीत, गाणी केवळ मनोरंजनासाठीच नसतात त्यातून या विशेष मुलांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली जाऊ शकते असंही स्वॅग से स्वागत फेम विशालने स्पष्ट केले आहे. संगीत आणि गाण्यांमध्ये भावना असतात ज्या थेट रसिकांच्या काळजाला भिडतात असंही विशालने म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीची काहीना काही विशेषता असते. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं असंही विशालने म्हटले आहे. लोक विशेष मुलांना पागल किंवा वेडं म्हणून हिणवतं. मात्र या मुलांमध्ये काही तरी अभूतपूर्व आणि वेगळी शक्ती असते. त्यामुळे त्यांना वेडं म्हणणं चुकीचं असल्याचे विशालने सांगितले आहे. या मुलांसह काम करण्याची संधी लाभणं ही गौरवाची गोष्ट असल्याचं विशालने म्हटले आहे. या मुलांनी आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असंही विशालने आवर्जून सांगितलं.यशराज फिल्म्सचे प्रमुख आशीष पटेल यांनी या बँडची निर्मिती केली आहे. विशेष मुलांबाबत कायमच आमच्या मनात आदर होता. जात, धर्म, रंग, लिंग असा कोणताही भेद नसून हे जग खरंच सुंदर आहे हे दाखवायचं असल्याचे आशीष पाटील यांनी सांगितलं. यश चोप्रा यांची अप्रतिम कलाकृती असलेल्या दिल तो पागल है सिनेमातील गाणं विशेष मुलांच्या माध्यमातून हे गाणं नव्या रुपात सादर करुन जग सुंदर असल्याचा संदेश पोहचवण्यात यश आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. यांत विशालचं योगदान कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.