तब्बल 18 वर्षांनी तब्बू आणि मनोज वाजपेयी दिसणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 05:36 AM2018-03-29T05:36:07+5:302018-03-29T11:06:07+5:30
गोलमालनंतर पुन्हा एकदा तब्बू आपल्या दमदार अभिनय दाखवायला प्रेक्षकांना सज्ज झाली आहे. नुकताच तब्बूचा आगामी चित्रपट मिसिंगचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे
ग लमालनंतर पुन्हा एकदा तब्बू आपल्या दमदार अभिनय दाखवायला प्रेक्षकांना सज्ज झाली आहे. नुकताच तब्बूचा आगामी चित्रपट मिसिंगचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. यात तब्बल 18 वर्षानंतर तब्बू आणि मनोज वाजपेयी एकत्र दिसणार आहेत. तब्बू आणि मनोजसह यात अन्नू कपूर ही दिसणार आहेत. मिसिंग हा एक रहस्यपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे तर चित्रपटाची निर्मिती नीरज पांडे आणि मनोज वाजपेयी करतायेत.
चित्रपटाचा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे. चित्रपटात तब्बू आणि मनोज यांच्या पती-पत्नीचे नातं असणार आहे. दुबे नावाचं एक जोडपं आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह बाहेरगावी पर्यटनाला जातं. त्यावेळी त्यांची ही मुलगी हरवते आणि मग सुरू होतो शोध. तो करण्यासाठी हाजीर होतो अन्नू कपूर. तब्बू आणि मनोज वाजपेयी 8 वर्षांनी एका सिनेमात काम करतायत. 2010मध्ये दिल पे मत ले यार सिनेमात दोघं होते. आता या दिग्गज कलाकारांची जुगलबंदी आणि थरार अनुभवायला मिळणार आहे 6 एप्रिलला.
तब्बू आणि मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. गोलमाल रिटर्ननंतर तब्बू मिसिंगमध्ये दिसणार आहे. तर मनोज वाजपेयी काही दिवसांपूर्वी आलेल्या 'अय्यारी' चित्रपटात दिसला होता. अभय सिंग या एकाप्रामाणिक लष्करी अधिकाऱ्याची भूमिका त्याने साकारली होती. त्याच्यावर एका गुप्त मोहिमेची जबाबदारी सोपवली जाते. या गुप्त मोहिमेत सामील टीमला निनावी पद्धतीने आपली मोहिम पूर्ण करायची असते. त्यामुळेच भारतीय लष्कराच्या नजरेत या टीमचे कुठेही अस्तित्व नसते. हा एक थ्रीलर चित्रपट होता. मनोज वाजपेयी, अनुपम खेर, नसीरूद्दीन शहा, अदील हुसैन अशी दिग्गजांची फौज असूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकला नव्हता.