​१९ वर्षे अभिनय केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने अचानक घेतला मोठा निर्णय, चाहत्यांची होणार निराशा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 08:06 AM2018-04-17T08:06:43+5:302018-04-17T13:36:43+5:30

‘साराभाई वर्सेज साराभाई’ हा टीव्ही शो आठवतं असेलचं. रत्ना पाठक आणि सतीश शाह यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या शोमध्ये ...

After 19 years of acting, the actor took a sudden decision, fans will be disappointed! | ​१९ वर्षे अभिनय केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने अचानक घेतला मोठा निर्णय, चाहत्यांची होणार निराशा!

​१९ वर्षे अभिनय केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने अचानक घेतला मोठा निर्णय, चाहत्यांची होणार निराशा!

googlenewsNext
ाराभाई वर्सेज साराभाई’ हा टीव्ही शो आठवतं असेलचं. रत्ना पाठक आणि सतीश शाह यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या शोमध्ये आणखी एक असेच दमदार पात्र होते. होय, रोसेसचे. अभिनेता राजेश कुमारने रोसेसची ही भूमिका साकारली होती. याच रोसेस उर्फ राजेश कुमारबद्दल एक बातमी आहे. होय, राजेश कुमार अभिनय सोडून बिहारच्या त्याच्या गावात पोहोचल्याची खबर आहे. कशासाठी? तर शेती करण्यासाठी...



चर्चा खरी मानाल तर,अलीकडे राजेश कुमारने अभिनयापासून बे्रक घेत शेतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. होय, बिहारच्या बर्मा या आपल्या गावाला स्मार्ट बनवण्यासाठी तो सध्या झटतोय. आपल्या पुर्वजांच्या जमिनीवर तो आॅर्गेनिक शेती करतोय.



गतवर्षी राजेश बर्माला गेला आणि येथून एक निर्धार करूनचं परतला. तो म्हणजे, येथे शेती करण्याचा. एकदिवस आंब्याच्या झाड्याखाली बसला असताना त्याला बर्माला स्मार्ट गाव बनवण्याची कल्पना आली आणि पुढे त्याने ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा निश्चय केला. बर्मामध्ये ना पाणी होते ना वीज. यानंतर राजेशने गावात पाणी, वीज आणण्यासाठी धडपड सुरू केली. हळूहळू राजेशची मेहनत रंग दाखवू लागली आणि गावाची स्थिती सुधारत गेली. अजूनही राजेश बर्माला स्मार्ट गाव बनवण्यासाठी धडपडतो आहे. आता बर्मातचं शेती करण्याचा संकल्प राजेशने सोडला आहे. तूर्तास राजेश पाटण्यापासून १२५ किमी अंतरावरच्या बर्मा गावात शेती करतोय. यासाठी त्याने अ‍ॅक्टिंगवरही पाणी सोडले आहे.
१९९८ मध्ये आपल्या प्रेग्नंट बहीणीच्या देखरेखीसाठी राजेश मुंबईत आला होता. बिहारमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्याला मुंबईच्या एक्स जेविअर कॉलेजातून मास कम्युनिकेशन करायचे होते. पण याचदरम्यान एका मित्राने त्याला एक भूमिका आॅफर केली. यात त्याला केवळ एक संवाद म्हणायचा होता. ‘ये रही आपकी टिकट....’ एवढाच हा डायलॉग होता. हा डायलॉग बोलण्यासाठी राजेशने २० रिटेक घेतले होते आणि यामोबदल्यात त्याला १००० रूपये मिळाले होते. येथूनचं राजेशने अभिनय करण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: After 19 years of acting, the actor took a sudden decision, fans will be disappointed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.