२० वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार 'वीर झारा', भारतासह या देशात होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:46 PM2024-11-08T13:46:17+5:302024-11-08T13:48:21+5:30

Veer Zara Movie Re release: शाहरुख खान आणि प्रिती झिंटा अभिनीत चित्रपट 'वीर झारा' २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जागतिक ब्लॉकबस्टर वीर झारा ७ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०० स्क्रीन्सवर पुन्हा रिलीज होणार आहे.

After 20 years, 'Veer Zara' will once again hit the silver screen, and will be released in this country, including India | २० वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार 'वीर झारा', भारतासह या देशात होणार प्रदर्शित

२० वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार 'वीर झारा', भारतासह या देशात होणार प्रदर्शित

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रिती झिंटा (Priti Zinta) अभिनीत चित्रपट 'वीर झारा' (Veer Zara Movie) २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जागतिक ब्लॉकबस्टर वीर झारा ७ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०० स्क्रीन्सवर पुन्हा रिलीज होणार आहे. सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच त्याचा प्रीमियरही होणार आहे. यानंतर त्याचे शो ओमान आणि कतारमध्येही चालतील. 

शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी अभिनीत वीर झारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट आहे. हा भारतात, परदेशात तसेच जगभरात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. आता वीर झारा यूएसए, कॅनडा, यूएई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन, कुवेत, यूके, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजीमध्ये पुन्हा प्रदर्शित होईल. यासोबतच सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतही शो चालणार आहेत.

वीर झारा २००४ रोजी झाला होता प्रदर्शित
शाहरुख खान स्टारर हा चित्रपट १२ नोव्हेंबर २००४ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला १२ तारखेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या खास निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट २३ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने भारतात ६० कोटींची कमाई केली होती. याशिवाय चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने ९७ कोटींचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट त्याच्या काळातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. शाहरुख खान आणि प्रिती झिंटासोबतच राणी मुखर्जी आणि मनोज बाजपेयीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

आमच्या फॅन्ससाठी एक खास भेट
आंतरराष्ट्रीय वितरणाचे उपाध्यक्ष नेल्सन डिसूझा म्हणाले, वीर झाराला जगभरात एक मोठा फॅन बेस आहे आणि या २०व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही हा चित्रपट पुन्हा रिलीज करत आहोत, जेणेकरून चाहते जगभरात ही प्रेमकहाणी पुन्हा अनुभवू शकतील. सोशल मीडियावर वाढता उत्साह, तसेच जगभरातील फॅन्सचे रिक्वेस्ट पाहून यशराज फिल्म्सने हा निर्णय घेतला आहे. हे पाऊल आमच्या फॅन्ससाठी एक खास भेट आहे.
 

Web Title: After 20 years, 'Veer Zara' will once again hit the silver screen, and will be released in this country, including India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.