27 वर्षांनंतर कमल हसन यांच्या 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला; पहिले पोस्टर रीलिज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 07:04 PM2023-10-29T19:04:19+5:302023-10-29T19:07:54+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन याचं फिल्मी करिअर आणि राजकीय करिअर देखील नेहमीच चर्चेत असंत. अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या जोरावर ...
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन याचं फिल्मी करिअर आणि राजकीय करिअर देखील नेहमीच चर्चेत असंत. अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली आहे. ते उत्कृष्ट अभिनेते तर आहेतच शिवाय ते उत्तम दिग्दर्शक, लेखक, गायकही आहेत. कमल हसन यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल 27 वर्षांनंतर कमल हसन यांच्या 'इंडियन' या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Indian 2 An INTRO @ikamalhaasan@anirudhofficial#siddharth@MsKajalAggarwal@Rakulpreet@iam_SJSuryah#vivek@actorsimha#nedumudivenu@thondankani@priya_Bshankar#manobala@GulshanGroverGG#piyushmisra#bramhamanandampic.twitter.com/g49V8HvqSM
— Shankar Shanmugham (@shankarshanmugh) October 29, 2023
या चित्रपटाची पहिली झलक ३ नोव्हेंबरला चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. रविवारी निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून ही माहिती दिली. सोशल मीडियावर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, 'सेलिब्रेशन सुरू झाले आहे. 3 नोव्हेंबर रोजी 'इंडियन 2' ची पहिली झलक पाहण्यासाठी सज्ज व्हा. सुमारे 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात कमल हसन भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसणार आहे.
'इंडियन 2' हा चित्रपट 1996 मध्ये रिलीज झालेल्या कमल हासनच्या 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वेल आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन एस शंकर यांनी केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. या चित्रपटात कमल यांच्यासोबत काजल अग्रवाल दिसणार आहे. याशिवाय रकुल प्रीत सिंग, सिद्धार्थ आणि बॉबी सिम्हा सारखे कलाकारही असतील. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे 2011 मध्ये अण्णा हजारे चर्चेत आले होते. तेव्हा निर्माते एएम रत्नम यांनी शंकर यांच्याजवळ 'इंडियन' चित्रपटाच्या सिक्वेल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये सिक्वेलची घोषणा केली. अखेर जानेवारी 2019 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. चेन्नई, भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये येथे चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. जोहान्सबर्ग आणि तैवानमध्येही काही भाग शूट करण्यात आले आहेत.