बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं अशी जिंकली कॅन्सर विरोधातील लढाई, म्हणाली - 'मी मरेन असं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:38 PM2022-04-19T13:38:03+5:302022-04-19T13:38:27+5:30

२०१८ साली या अभिनेत्रीला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यावेळी तिला खूप मोठा धक्का बसला होता.

After a treatment for cancer, the famous Bollywood actress's emotional post goes viral, saying - 'I will die ...' | बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं अशी जिंकली कॅन्सर विरोधातील लढाई, म्हणाली - 'मी मरेन असं...'

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं अशी जिंकली कॅन्सर विरोधातील लढाई, म्हणाली - 'मी मरेन असं...'

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिने  १९९४ साली आग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिलाच चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर मेजर साब, हम साथ साथ है, कल हो ना हो या चित्रपटात काम केले आहे. २०१८ साली सोनाली ब्रेंद्रेला कर्करोग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसला होता. मात्र, तिने हार मानली नाही. नाली बेंद्रे हिची एक पोस्ट सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये सोनाली बेंद्रे हिने या कठीण प्रसंगातून जाताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. सध्या सोनाली बेंद्रे डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर (Dance India Dance Little Master) या शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीदरम्यान, तिने कॅन्सरशी लढा आणि तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या. या पोस्टमध्ये सोनाली बेंद्रे म्हणाली की, या आजारामुळे माझा मृत्यू होईल, असे मला कधीच वाटले नव्हते'. पुढे ती म्हणाली की, 'पण मृत्यूचा विचार माझ्या मनात आला नाही. मला वाटले की हा खूप मोठा संघर्ष असेल, पण मी मरेन असे मला कधीच वाटले नाही. कारण की मी कायम सकारात्मक विचार केला. अमेरिकेत उपचार सुरू असताना मला मित्रमंडळी, नातेवाईक या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला. हा आजार झाला असताना आपल्याला मित्रमंडळी नातेवाईक यांची मोठी गरज असते.


 माझ्या पोटात खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर पसरला होता. त्यामुळे डॉक्टरांनी मला ३०% जगण्याची शक्यता सांगितली होती. मात्र, तरीदेखील मला असे वाटत होते की मी आजारावर मात करेन आणि झालेही तसेच. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या आजाराला समोर जावे. यातून तुम्हाला बाहेर पडण्यास मदत मिळते, असे तिने सांगितले आहे. 

Web Title: After a treatment for cancer, the famous Bollywood actress's emotional post goes viral, saying - 'I will die ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.