'आदिपुरुष'नंतर क्रिती सनॉनला शॉर्ट्समध्ये पाहून भडकले नेटकरी, म्हणाले - 'सीतेची भूमिका संपली, आता पुन्हा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:13 PM2023-06-24T18:13:03+5:302023-06-24T18:13:33+5:30
Kriti Sanon : क्रिती सनॉनचा शॉर्ट्समधील एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यातील तिच्या कपड्यांवरुन तिच्यावर खूप टीका केली जात आहे.
प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon)चा आदिपुरुष (Adipurush) चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पहिल्या दिवसांपासून संवाद, व्हिएफएक्स तसेच पात्रांवरुन चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने टीका होते आहे. तसेच चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दरम्यान आता क्रिती सनॉनचा शॉर्ट्समधील एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यातील तिच्या कपड्यांवरुन तिच्यावर खूप टीका केली जात आहे.
अभिनेत्री क्रिती सनॉनला नुकतीच वर्सोवा येथील मुकेश छाबडा यांच्या ऑफिसमध्ये जाताना स्पॉट झाली. यावेळी पापाराझींनी तिला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओत क्रितीने शॉर्ट्सवर लॉंग जॅकेट परिधान केले होते. यापूर्वी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे प्रमोशन करताना क्रितीने ट्रेडिशनल लूकला प्राधान्य दिल्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
क्रिती सनॉन आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर
क्रितीच्या या व्हिडीओवर नेटकरी टीका करत आहेत. एका युजरने लिहिले की, आदिपुरुषमधील सीतेची भूमिका संपली आता पुन्हा असे शॉर्ट ड्रेस घालणे सुरु केलेस. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की क्रिती सनॉन ही फ्लॉप हिरोईन आहे आणि एवढ्या चांगल्या चित्रपटाची ओम राऊत आणि क्रितीने मिळून वाट लावली. लोकांनी क्रितीची तुलना रामायणातील सीता दीपिका चिखलिया यांच्याशी करायची आहे आणि दीपिका यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे असे म्हटले आहे.
आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने रामाची, तर क्रितीने सीतेची भूमिका साकारली आहे. सनी सिंगने लक्ष्मणाची, तर हनुमानाची भूमिका देवदत्त नागेने साकारली आहे. भूषण कुमार निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले असून पटकथा मनोज मुंतशीर यांनी लिहिली आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे तर SacNilk च्या ट्रेड रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' ने रिलीजच्या ८ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी फक्त ३.५० कोटी कमावले आहेत. 'आदिपुरुष'च्या कमाईचा हा आकडा आजपर्यंतचा सर्वात कमी कलेक्शन आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता २६३.४० कोटींवर गेली आहे.