अक्षय कुमारनंतर कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावला आयुषमान खुराणा, मुख्यमंत्री सहायता निधीला केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:21 PM2021-04-28T12:21:49+5:302021-04-28T12:22:21+5:30

अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यपने कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

After Akshay Kumar, Ayushman Khurana came forward to help in the crisis of Corona | अक्षय कुमारनंतर कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावला आयुषमान खुराणा, मुख्यमंत्री सहायता निधीला केली मदत

अक्षय कुमारनंतर कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावला आयुषमान खुराणा, मुख्यमंत्री सहायता निधीला केली मदत

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यपने कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केले आहे आणि या संकटाच्या काळात आपल्या चाहत्यांनीही सरकारला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे 

आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे. ज्यात त्यांनी अशा प्रत्येक भारतीयांचे आभार मानले आहेत ज्यांनी त्यांना या संकटातून सतत पीडित लोकांसाठी योगदान देण्यास प्रेरित केले आहे.


त्यांनी म्हटले आहे की, आपण गेल्या एका वर्षापासून या संकटाला सामोरे जात आहोत. या महारोगराईने आपली मने मोडली आहेत, वेदना व दु:ख सहन करण्यास भाग पाडले आहे. एकमेकांशी ऐक्य साधत, मानवता दाखवत या संकटाचा कसा सामना करावा हे आपण दाखवून दिले आहे. आज पुन्हा एकदा हे कोरोनाचे संकट आपल्याला धैर्य, प्रतिकारशक्ती आणि एकमेकांना पाठिंबा दाखवण्यास सांगत आहे.


ते पुढे म्हणाले की, संपूर्ण देशभर लोक शक्य तितक्या एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ताहिरा आणि मी ज्यांना आम्हाला अधिक मदत करण्यासाठी प्रेरित केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा आम्ही सतत प्रयत्न केला आहे आणि आता आवश्यकतेच्या क्षणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये देखील हातभार लावला आहे.


आयुषमान आणि ताहिरा यांनी जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घेत गरजूंना मदत करण्याची विनंती केली आहे. ही वेळ आहे जेव्हा आपण एक समाज म्हणून पुढे आले पाहिजे आणि एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. लोकांना शक्य तितक्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपण सर्वजण स्वतःहून मदत करून आपले योगदान देऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: After Akshay Kumar, Ayushman Khurana came forward to help in the crisis of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.