अक्षय कुमारनंतर या अभिनेत्याने नाकारली पान मसाला कंपनीची जाहिरात, मिळत होती मोठी रक्कम, म्हणाला - जबाबदारी....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:01 AM2024-08-30T11:01:46+5:302024-08-30T11:02:56+5:30

पान मसाला कंपनीच्या जाहिरातीवरून सेलिब्रेटी अनेकदा चर्चेत येताना दिसतात.

After Akshay Kumar, this actor rejected the advertisement of Pan Masala company, was getting huge amount, said - responsibility.... | अक्षय कुमारनंतर या अभिनेत्याने नाकारली पान मसाला कंपनीची जाहिरात, मिळत होती मोठी रक्कम, म्हणाला - जबाबदारी....

अक्षय कुमारनंतर या अभिनेत्याने नाकारली पान मसाला कंपनीची जाहिरात, मिळत होती मोठी रक्कम, म्हणाला - जबाबदारी....

पान मसाला कंपनीच्या जाहिरातीवरून सेलिब्रेटींमध्ये अनेकदा चर्चा होताना दिसते. अजय देवगण, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, शाहरूख खान आजही फ्लेवर्ड वेलचीच्या एका जाहिरातीत झळकताना दिसतात. अक्षय कुमारही दिसायचा पण आता त्याने पान मसाल्याच्या जाहिरातीतून काढता पाय घेतला आहे. अलिकडेच हृतिक रोशनला अशाप्रकारची जाहिरात करताना पाहून चाहते भडकले होते. आता अशी माहिती मिळते आहे की, आर. माधवन(R. Madhvan)ला पान मसालाच्या जाहिरातीसाठी विचारण्यात आले आहे. मात्र त्याने ही जाहिरात करण्यास नकार दिला आहे.

आर माधवनने पान मसाला कंपनीची ही जाहिरात नाकारली आहे. यासाठी माधवनला मोठ्या रकमेची ऑफरही देण्यात आली होती, मात्र त्याने ती नाकारली. तो स्वतःला कोणत्याही प्रकारच्या पान मसाल्याचा प्रचार करत नाही. माधवनला त्याच्या प्रेक्षकांप्रती असलेली जबाबदारी समजते. अशा परिस्थितीत, त्याच्या प्रेक्षकांना त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टीशी तो जोडू इच्छित नाही. सूत्रांनुसार, पान मसाला कंपनी आपला ब्रँड अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होती. या स्थितीत ती एका मोठ्या चेहऱ्याकडे पाहत होती. कंपनीने आर माधवनला एंडोर्समेंटसाठी मोठ्या रकमेची ऑफर देखील दिली, परंतु अभिनेत्याने स्पष्टपणे नकार दिला. मात्र, कंपनी आता पुन्हा एका मोठ्या चेहऱ्याच्या शोधात आहे जो त्यांच्यासाठी या जाहिरात करू शकेल.

जॉन अब्राहम म्हणाला...
अलिकडेच जॉन अब्राहमने पान मसाला जाहिरात करणाऱ्या सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे. त्याने म्हटले की, मी माझ्या सर्व सहकलाकारांचा आणि मित्रांचा आदर करतो. मी त्यांच्या जवळ आहे. पण पान मसाला जाहिरात केल्याबद्दल मी त्यांची स्तुती कधीच करणार नाही. मला कधीच कोणाच्या जीवाशी खेळायचे नाही. 

वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आर माधवनसाठी २०२४ हे वर्ष खूप चांगले होते. अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटात तो दिसला होता. त्याची व्यक्तिरेखाही खूप आवडली होती. आर माधवनचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. त्यात 'दे दे प्यार दे २', 'धुरंधर' आणि शंकरन आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीत अधीर्ष्टसाली आणि 'टेस्ट' हे चित्रपट आहेत, ज्यावर तो काम करत आहे. सध्या माधवन लंडनमध्ये असून 'ब्रिज'चे शूटिंग करत आहे.

Web Title: After Akshay Kumar, this actor rejected the advertisement of Pan Masala company, was getting huge amount, said - responsibility....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.