अखेर आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील भांडण संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 11:34 AM2017-11-09T11:34:23+5:302017-11-09T17:04:23+5:30

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्याबद्दल आतापर्यंत आपल्या सगळ्यांच माहिती झाले आहे. दोघे एकमेकांशी भांडतात आणि पुन्हा एकत्र ...

After all, the fight between Aliya Bhatt and Siddharth Malhotra ended | अखेर आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील भांडण संपली

अखेर आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील भांडण संपली

googlenewsNext
िया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्याबद्दल आतापर्यंत आपल्या सगळ्यांच माहिती झाले आहे. दोघे एकमेकांशी भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपची मीडियामध्ये चर्चा होती. ऐवढेच नाही तर इत्तेफाकच्या प्रेस कॉन्फ्रेंस दरम्यान सिद्धार्थ सगळ्यांसमोर एकटाच आला होता.  प्रेस कॉन्फ्रेंस संपून काही दिवसच झाले असतानाच दोघे पुन्हा एकदा एकत्र आल्याच्या बातम्यापण येऊ लागल्या. डीएनएच्या रिपोर्टनुसार सिद्धार्थ आणि आलिया एकमेकांना खूप पसंत करतात आणि एकमेकांपासून कधीच वेगळे नाही होऊ शकत. भांडण झाल्यानंतर दोघे एकमेकांना भेटण्याची संधी शोधत असतात. शाहरुख खानच्या बर्थ डे पार्टीत ही दोघे एकत्र दिसले होते. ऐवढेच नाही तर  सिद्धार्थने आदल्या दिवशी घातलेल्या टी-शर्टमध्ये घालून दुसऱ्या दिवशी आलिया मीडियासमोर आली. त्यामुळे त्यांचे अफेअर पुन्हा एकदा चर्चेत आले. 
दोघांची जोडी  सडक 2 दिसणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात लीड रोलमध्ये पूजा भट्ट आणि संजय दत्त दिसणार आहेत. याशिवाय काही तरुण चेहऱ्यांना सुद्धा या चित्रपटात घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी सिद्धार्थ आणि आलियाचे नाव चर्चेत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज करण्यात येणार आहे. मात्र अजून या चित्रपटाच्या डेट्स फायनल झाल्या नाही आहे.

ALSO RAED :  शाहरूखच्या बर्थ डे पार्टीत दिसला अजब ‘इत्तेफाक’! सिद्धार्थ मल्होत्राचा टी-शर्ट आलिया भट्टच्या अंगावर!

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्राचा इत्तेफाक चित्रपट रिलीज झाला आहे. ‘इत्तेफाक’ हा चित्रपट १९६९ मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या ‘इत्तेफाक’चा आॅफिशिअल रिमेक आहे. राजेश खन्ना व नंदा यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. रिमेकमध्ये मात्र ही जागा सिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिन्हा या दोघांनी घेतलीय. तर आलिया भट्ट करण जोहर निर्मिती ब्रह्मस्त्र चित्रपट दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतो आहे. यात आलियासह रणवीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  हा चित्रपट तीन भागात तयार करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: After all, the fight between Aliya Bhatt and Siddharth Malhotra ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.