अखेर प्रत्येक चित्रपटात श्रीदेवीचा हीरो बनण्याचा जितेंद्र यांनी का हट्ट धरला असावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 12:34 PM2017-11-09T12:34:45+5:302017-11-09T18:04:45+5:30
बॉलिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास अमिताभ बच्चन-रेखा ही जोडी आजही ...
ब लिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास अमिताभ बच्चन-रेखा ही जोडी आजही प्रेक्षकांना पडद्यावर बघाविशी वाटते. त्याकाळात आणखी एक जोडी अशीच लोकप्रिय होती. होय, आम्ही जितेंद्र आणि श्रीदेवी या सुपरहिट जोडीविषयी तुम्हाला सांगत आहोत. जितेंद्र यांनी श्रीदेवीसोबत पहिल्यांदा राघवेंद्र राव यांच्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात श्रीदेवीला कास्ट करण्यासाठी राघवेंद्र राव यांना जितेंद्र यांनीच फोर्स केला होता. त्याकाळी श्रीदेवीचा एकच चित्रपट रिलीज झाला होता. तोदेखील फ्लॉप झाला. त्यामुळे दिग्दर्शकही श्रीदेवीला चित्रपटात घेण्यासाठी एकप्रकारे घाबरून होते. परंतु जितेंद्र यांच्या हट्टामुळे राघवेंद्र राव यांनी श्रीदेवीला ‘हिम्मतवाला’मध्ये लीड अभिनेत्री म्हणून कास्ट केले. पुढे हा चित्रपट सुपरहिट झाला अन् श्रीदेवीसाठी इंडस्ट्रीमधील सर्व दरवाजे उघडले गेले.
जितेंद्र यांनादेखील या चित्रपटाच्या यशामुळे एवढा आनंद झाला की, त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात श्रीदेवीला संधी देणार असल्याचे बोलून दाखविले. तसेच त्यांनी दिग्दर्शक तथा निर्मात्यांनाही ही गोष्ट स्पष्ट केली की, मी त्याच चित्रपटात काम करणार ज्या चित्रपटात श्रीदेवी अभिनेत्री असेल. दिग्दर्शकांकडे जितेंद्र यांची ही मागणी मान्य करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नसायचा. त्यामुळेच जितेंद्र आणि श्रीदेवीची जोडी जवळपास १६ चित्रपटांमध्ये झळकली. प्रेक्षकांनी या जोडीला भरभरून प्रेम दिले.
विशेष म्हणजे या जोडीच्या १६ चित्रपटांपैकी १३ चित्रपट यशस्वी झाले. या सर्व चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर श्रीदेवी आणि जितेंद्र यांच्यात अफेअर असल्याच्याही चर्चा रंगल्या. त्याकाळी हे दोघे प्रेमात असावे, अशी इंडस्ट्रीत जोरदार चर्चा होती. मात्र या केवळ चर्चाच ठरल्या. कारण हे दोघे तेव्हा आणि आजही चांगले मित्र आहेत. जितेंद्र यांच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास, त्यांनी श्रीदेवीनंतर सर्वाधिक चित्रपट अभिनेत्री जया प्रदा यांच्यासोबत केले.