आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:11 PM2024-09-14T15:11:08+5:302024-09-14T15:11:56+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिकाने ८ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला.

After becoming a mother, will Deepika Padukone retire from acting? | आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय

आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिकाने ८ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्रीला अद्याप रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नसला तरी दीपिकाच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

नुकतेच शाहरुख खान दीपिका आणि तिच्या लेकीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. आता असे सांगितले जात आहे की दीपिका पादुकोण आपल्या मुलीचे संगोपन करण्यासाठी रणबीर आणि आलियाची पालकत्वाची स्टाइल निवडू शकते. यासोबतच दीपिका देखील ऐश्वर्याच्या पालकत्वाच्या शैलीने खूप प्रभावित झाली आहे.


काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की दीपिका पादुकोण तिच्या मुलीच्या संगोपनासाठी ऐश्वर्या रायला फॉलो करू शकते. ऐश्वर्या रायने तिची मुलगी आराध्या हिला स्वतः वाढवले ​​आहे आणि तिने मुलांना सांभाळणाऱ्या नॅनीचा पाठिंबा घेतला नाही. अशा परिस्थितीत दीपिकाही आपल्या मुलीसाठी नॅनी ठेवणार नसून तिला एकटीने वाढवणार असल्याचा दावा केला जात आहे. ऐश्वर्या रायचा तिची मुलगी आराध्याप्रती असलेला पझेसिव्हनेस पाहून सासू जया बच्चन यांनी तिला 'हँड्स ऑन मॉम' असा टॅग दिला होता.

वर्कफ्रंट
दीपिका पादुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलिकडेच कल्की 2898 या चित्रपटात दिसली होती. यापूर्वी ती फायटर आणि पठाणमध्ये दिसली होती. आता दीपिका लवकरच सिंघम अगेन चित्रपटात लेडी कॉप स्वॅगमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

Web Title: After becoming a mother, will Deepika Padukone retire from acting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.