खासदार बनल्यानंतर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यानं मानधनात केली वाढ, पण पाच कोटींची मागणी केल्यानं मिळाला ‘बाबाजी का ठुल्लू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:41 PM2019-07-07T12:41:47+5:302019-07-07T12:42:43+5:30
सनी देओलला ‘फतेह सिंग’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्याने निर्मात्यांना ५ कोटींचे मानधन सांगितले. सनी देओलचे मानधन डोईजड झालेल्या निर्मात्यांनी त्याला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्याचेच ठरवले.
बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने गुरूदासपूर येथून लोकसभा निवडणूक लढवली. गुरूदासपूर येथून तो निवडूनही आला. आता खासदार बनला म्हटल्यावर त्याने साहजिकच त्याचा भाव वाढला. आता त्याने त्याचे मानधन देखील वाढवले आहे. त्याला ऑफर झालेल्या आगामी चित्रपटावेळी त्याने पाच कोटींची मागणी केल्याने त्या प्रोजेक्टवर पाणी सोडावे लागले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओलला ‘फतेह सिंग’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्याने निर्मात्यांना ५ कोटींचे मानधन सांगितले. सनी देओलचे मानधन डोईजड झालेल्या निर्मात्यांनी त्याला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्याचेच ठरवले. त्याच्याजागी एका दाक्षिणात्य अभिनेत्याने काम करण्याची तयारी दाखवल्याने सनी देओलला या चित्रपटावर पाणी सोडावे लागले.
सुत्रांनुसार कळतेय की, ‘फतेह सिंग’ या चित्रपटाचे बजेट १५ ते १८ कोटी एवढेच होते. सनीच्या मागणीमुळे निर्मात्याचे सगळे आर्थिक गणित बिघडणार होते. या चित्रपटाला राजकुमार संतोषी हे दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटामुळे सनी आणि राजकुमार संतोषी हे २३ वर्षांनंतर एकत्र काम करताना दिसणार होते. या चित्रपटाचे कथानक देशभक्तीशी निगडित आहे. लंडनला स्थलांतरित होणाऱ्या युवापिढीवर आधारित चित्रपटाची कहानी असणार आहे. चित्रपटाचा नायक हा पंजाबहून लंडनला जातो. लंडनला येऊन तो बॉम्ब डिफ्युज करणाऱ्या गँगमध्ये काम करतो. यापूर्वी सनी देओल ‘यमला पगला दिवाना’ च्या तिसऱ्या भागात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई क रू शकला नाही.