बदललेल्या लूकमुळे ट्रोल झाल्यानंतर आयशा टाकियानं सोडलं मौन, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:46 AM2024-08-29T10:46:34+5:302024-08-29T10:47:13+5:30

Ayesha Takia : अभिनेत्री आयशा टाकियाच्या लेटेस्ट फोटो पाहून चाहते चकीत झाले आहेत. तिच्या बदललेल्या लूकसाठी तिला खूप ट्रोल केले गेले. आता आयशाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे.

After being trolled for her changed look, Ayesha Takia broke her silence, shared a post and said... | बदललेल्या लूकमुळे ट्रोल झाल्यानंतर आयशा टाकियानं सोडलं मौन, पोस्ट शेअर करत म्हणाली...

बदललेल्या लूकमुळे ट्रोल झाल्यानंतर आयशा टाकियानं सोडलं मौन, पोस्ट शेअर करत म्हणाली...

आयशा टाकिया(Ayesha Takia)ने २००४ मध्ये 'टारझन: द वंडर कार' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी तिला पदार्पणासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार आणि आयफा पुरस्कार मिळाला. ती तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. सलमान खानसोबत 'वॉन्टेड'मध्ये काम केल्यानंतर ती नॅशनल क्रश झाली. फरहान आझमीशी लग्न केल्यानंतर आयशा टाकियाने अभिनयाला रामराम केला. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सिनेइंडस्ट्रीला रामराम केल्यानंतर आयशाच्या लूकमध्येही बरेच बदल पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात तिचे काही फोटो व्हायरल झाले होते ज्यात तिला ओळखणे कठीण झाले. प्लास्टिक सर्जरीमुळे बदललेल्या चेहऱ्यामुळे आयशाला खूप ट्रोल करण्यात आले. मात्र, आता आयशाने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आयशा टाकियाने शेअर केली क्रिप्टिक नोट
आयशा तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे इतकी ट्रोल झाली की तिने तिचे इंस्टाग्राम अकाउंट एका दिवसासाठी डिॲक्टिव्हेट केले. मात्र, त्यानंतर आयशा नव्या अवतारात सोशल मीडियावर परतली. यावेळी, ट्रोलर्सवर थेट टीका करण्याऐवजी, आयशा ऑन-पॉइंट कोट्स शेअर करत आहे. २८ ऑगस्टला, आयशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर क्रिप्टिक नोट्स शेअर केली आहे.

आयशाने तिच्या IG वर एक काळी मांजरीचा फोटो शेअर करत लिहिले की, "मी स्वत:ला अधिक स्पष्टीकरण द्यावे की गैरसमजात राहावं?" त्यावर आयशाने लिहिले की, "नेहमीच चुकीचं समजलं गेलं" अभिनेत्रीने आणखी एक आयजी स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, "कधीकधी तुम्हाला फक्त 'मी यासाठी खूप सुंदर आहे' असे म्हणावे लागेल आणि पुढे जावे लागेल."

लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले हैराण
गेल्या आठवड्यात आयशाने तिचे दोन फोटो पोस्ट केले होते, ज्यामध्ये ती साडी नेसलेली दिसत होती. आयशाचे हे फोटो व्हायरल झाले होते. ती पारंपारिक लूकमध्ये दिसली, तिचा बदललेला लूक पाहून नेटिझन्स अवाक् झाले. त्यांनी आयशावर प्लास्टिक सर्जरी आणि ब्युटी ट्रीटमेंट केल्याचे म्हटले. याआधीही आयशा अनेकदा ट्रोल झाली आहे.

Web Title: After being trolled for her changed look, Ayesha Takia broke her silence, shared a post and said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.