सलमान खान-कॅटरिना कैफ चाहत्यांना देणार एक खास सरप्राईज!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:00 AM2019-02-15T06:00:00+5:302019-02-15T06:00:02+5:30
सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी तयार आहेत. लवकरच सलमान व कॅटचा ‘भारत’ रिलीज होतोय. पण या चित्रपटानंतरही ही जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर झळकणार आहे.
सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी तयार आहेत. लवकरच सलमान व कॅटचा ‘भारत’ रिलीज होतोय. पण या चित्रपटानंतरही ही जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर झळकणार आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचणार. पण इथेच थोडा ट्विस्ट आहे. होय, या चित्रपटात सलमान व कॅट लीड रोलमध्ये नसतील. चित्रपटात केवळ त्यांच्यावर चित्रीत एक गाणे तेवढे असेल.
कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ आणि सूरज पांचोली यांचा आगामी चित्रपट ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटात ‘ओ ओ जाने जाना’ हे गाणे रिक्रिऐट केले जाणार आहे. या गाण्याचे दोन व्हर्जन बनवले जातील. एक व्हर्जनमध्ये सूरज आणि इसाबेल दिसणार आणि दुस-या प्रमोशनल व्हर्जनमध्ये सलमान आणि कॅट. आहे ना मजेदार.
‘भारत’चे शूटींग संपल्यानंतर लगेच या गाण्याचे शूट होणार असे कळतेय. सलमान व कॅटचे हे गाणे भलेही चित्रपटात दिसणार नाही. पण प्रमोशनसाठी त्याचा मोठा वापर होणार आहे. चाहत्यांसाठी हेही नसे थोडके...!!
‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून कॅटची बहीण इसाबेल बॉलिवूड डेब्यू करते. इसाबेल यात बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात. कोरिओग्राफी आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाचा सहाय्यक स्टेनली डिकोस्टा हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. अर्थात यात रेमोचाही सहभाग आहे. होय, या चित्रपटाची कथा रेमोने लिहिली आहे. तीन वर्षांपूर्वी सूरजने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिला चित्रपट दणकून आपटला . साहजिकचं या चित्रपटाकडून सूरजला मोठ्या अपेक्षा आहेत.