मिशन स्टार्ट... #BoycottPathan...! अक्षय, आमिरनंतर आता शाहरूख खान नेटकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 12:13 PM2022-08-14T12:13:53+5:302022-08-14T12:14:57+5:30
#BoycottPathan Trend On Twitter: होय, ‘रक्षाबंधन’ आणि ‘लालसिंग चड्ढा’नंतर शाहरूख खानचा ‘पठान’ नेटकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आला आहे.
#BoycottPathan Trend On Twitter: आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या दोन्ही सिनेमांना सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाला. आमिरला भुतकाळातील काही वक्तव्यं भोवली आणि सोशल मीडियावर बायकॉट #BoycottLalSinghchaddha ट्रेंड झाला. अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमाचीही तीच गत झाली. ‘रक्षाबंधन’च्या लेखिका कनिका ढिल्लो यांच्या एका हिंदूविरोधी जुन्या ट्विटमुळे नाराज असलेल्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बायकॉट #BoycottRakshaBandhan ट्रेंड केला. गेल्या काहीदिवसांपासून बॉलिवूडमध्ये नवनवे सिनेमे रिलीज होत आहेत. पण प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. रिलीजआधीच सोशल मीडियावर या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. आता आणखी एका आगामी चित्रपटाला विरोध सुरू झाला आहे.
होय, ‘रक्षाबंधन’ आणि ‘लालसिंग चड्ढा’ यानंतर शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठान’ (Pathan) नेटकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आला आहे. ट्विटरवर #BoycottPathan ट्रेंड होत आहे.
Next Mission#BoycottPathan#BoycottbollywoodCompletelypic.twitter.com/8pq07SmTPk
— Dilip Singh Chouhan (@The_DilipRajput) August 13, 2022
दीर्घकाळानंतर शाहरूख ‘पठान’ या चित्रपटाद्वारे कमबॅक करतोय. पण त्याच्या या कमबॅक चित्रपटाला प्रदर्शनाआधीच जोरदार विरोध होताना दिसतोय. ‘नेक्स्ट मिशन बायकॉट पठान,’ असं एका युजरने लिहिलं आहे. ‘मिशन स्टार्स, बायकॉट पठान,’ असं अन्य एका युजरने लिहिलं आहे.
Mission start#BoycottPathanpic.twitter.com/P5jyHAm76a
— Durgesh Patil (@Durgesh48737608) August 13, 2022
Coming Soon #BoycottPathan after successful blockbusted by #BoycottLalSinghChaddha#Boycott_Lal_Singh_Chaddhahttps://t.co/8YKJvsTfPA
— Indian Ashish🇮🇳 (@ashishbangar25) August 12, 2022
का होतोय ‘पठान’ला विरोध?
नेटकरी ‘पठान’वर बहिष्कार घालण्याची मागणी का करत आहेत? यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण अनेक युजर्स यामागे दीपिका पादुकोण हे कारण असल्याचं म्हणत आहेत. ‘पठान’ या चित्रपटात शाहरूख खानसोबत दीपिका पादुकोण लीड रोलमध्ये आहे. अशात काही लोकांनी दीपिकाच्या जेएनयू भेटीचा मुद्दा उकरून काढला आहे. दीपिकाला ‘देशद्रोही’ ठरवत, लोक ‘पठान’चा विरोध करत आहेत.
Never forget...#BoycottPathanpic.twitter.com/ED4f3tP5BJ
— Ooo Bhai Sahab😎 (@Sonu48419369) August 13, 2022
वाढलं मेकर्सचं टेन्शन!!
‘पठान’ हा सिनेमा पुढच्या वर्षी 25 जानेवारी चित्रपटगृहांत धडकणार आहे. या चित्रपटातील शाहरूखचा लुकही समोर आला आहे. शाहरूखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण चित्रपटाच्या रिलीजच्या इतक्या महिन्या आधीच सोशल मीडियावरचं चित्रपटाविरोधातील वातावरण तापलं आहे. साहजिकच मेकर्सचं टेन्शन वाढलं आहे. ‘बायकॉट लाल सिंग चड्ढा’ने आमिरच्या चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम झाला. बॉक्स ऑफिसवर आमिरच्या सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता शाहरूखच्या चित्रपटाचं काय होतं, ते बघूच.