कुटुंबाला एकटं सोडून संन्यासी बनले होते विनोद खन्ना, मृत्यूच्या दोन दिवसानंतर मुलगा अक्षय खन्नाने सांगितले होते त्यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 01:28 PM2021-01-19T13:28:04+5:302021-01-19T13:32:09+5:30
990 मध्ये विनोद यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले होते. या दोघांना साक्षी आणि श्रद्धा अशी दोन मुले झालीत. हाच साक्षी आता ओशोंचा शिष्य बनला असल्याचीही माहिती समोर आली होती.
हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि हॅडसम अभिनेते असा लौकिक मिळवणारे अभिनेता म्हणजे विनोद खन्ना. आपल्या अभिनयाने विनोद खन्ना यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलं पुढं चालवतायत. विनोद खन्ना यांचा लेक अक्षय खन्ना यानेही हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.विनोद खन्ना बॉलिवूडमधील दुसऱ्या नंबरचे सुपरस्टार होते. जेव्हा ते सुपरस्टार होते तेव्हापासून त्यांनी निर्मात्यांना त्यांच्या सिनेमात काम करायला नकार द्यायला सुरुवात केली होती.
1982 साली करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेऊन त्यांनी त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला. गुरू ओशो रजनीश यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अध्यात्माचे धडे गिरवायला सुरुवात केली.सगळं काही सुरळीत सुरु असतानाही विनोद खन्ना यांचे मन संसारात रमत नव्हतं. शेवटी त्यांनी संन्यास घेण्याचं ठरवलं. त्यांचा मुलगा अक्षय खन्ना पाच वर्षाचा होता. मुलांना काहीही त्यावेळी समजत नव्हते. अशावेळी त्यांनी कुटुंबाला एकटं सोडत ओशो आश्रमात राहिले.
संन्यास घेण्याआधी ते तासन् तास ओशो यांचे व्हिडिओ पाहायचे आणि अनेकदा पुण्यातील त्यांच्या आश्रमातही जायचे. विनोद खन्ना ह ओशोने सांगितलेल्या मार्गावर चालायला लागले होते. १९८२ मध्ये ते रजनीश आश्रमात जाऊन संन्यासी झाली. विनोद खन्नांनी ओशोंचे शिष्यत्व पत्करले त्या काळात ते बॉलिवूडपासून दुरावले होते.
संन्यास घेण्याच्या अनपेक्षित निर्णयामुळे कौटुंबिक आयुष्यातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पहिली पत्नी त्यांना सोडून गेली होती. (पहिल्या पत्नीपासून त्यांना अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन मुलं आहेत.) यानंतर 1990 मध्ये विनोद यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले होते. या दोघांना साक्षी आणि श्रद्धा अशी दोन मुले झालीत. हाच साक्षी आता ओशोंचा शिष्य बनला असल्याचीही माहिती समोर आली होती.
विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिंकदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. पदार्पण करताना त्यांना नायकाची भूमिका मिळाली नाही. सुरुवातीला साहाय्यक अभिनेता, खलनायक अशा भूमिका त्यांनी केल्या. मेरा गाव, मेरा देशमधील त्यांनी खलनायकाची भूमिका विशेष गाजली होती. अचानकमधील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्यांना दाद दिली.