दीपिका पदुकोण पाठोपाठ रणवीर सिंहनेही केली मानधनात वाढ, आकडा वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 02:10 PM2021-01-29T14:10:43+5:302021-01-29T14:17:27+5:30
रणवीर सिंग पुन्हा एकदा रोहित शेट्टीसोबत काम करतोय. रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या सिनेमात तो झळकणार आहे.
बॉलीवुडचा बाजीराव रणवीर सिंहची सध्या ''आज मै उपर आसमाँ निचे'' अशीच काहीशी अवस्था झाली असणार कारण लवकरच महागड्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचाही नाव गणले जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणनेही तिचे मानधन वाढवले होते. तिच्या मानधनाचा आकडा पाहून भल्याभल्यांना भोवळ येईल. महागड्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिकाचाही गणली जाते. मग पती रणवीर सिंह तरी कसा मागे राहणार. रणवीरनेही त्याच्या मानधन वाढवले आहे.
रणवीर सिंग पुन्हा एकदा रोहित शेट्टीसोबत काम करतोय. रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या सिनेमात तो झळकणार आहे. या सिनेमासाठी त्याने 50 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर रणवीर आता आपल्या प्रत्येक हिट सिनेमानंतर मानधनात वाढ करणार असल्याच्याही चर्चा आहेत. रणवीर 75 दिवस या सिनेमाचे शुटिंग करणार आहे. त्यानुसार तो दररोज सुमारे 66 लाख रुपये आकारत आहे. अशाप्रकारे तो सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूड अभिनेता ठरणार आहे.
तर दुसरीकडे दीपिकानेही असेच मानधन घेत सा-यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. दीपिका पादूकोण लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या सिनेमामध्ये झळकणार आहे. प्रभासने या सिनमासाठी ५० कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर दीपिका या सिनेमात काम करण्यासाठी २० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
सिनेमाच्या मानधनानंतर दीपिका भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या दोघेही नवरा-बायको भरभक्कम कमाई करण्यात बिझी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
लॉकडाऊनच्या काळात रणवीरसोबत राहणे सर्वात सोपे आहे, कारण तो 20 तास झोपतोय ज्यामुळे मला सर्व काही करण्याची संधी मिळतेय. जेव्हा तो चार तासांसाठी उठतो, तेव्हा आम्ही एकत्र खातो, सिनेमा पाहतो आणि व्यायाम करतो. या वेळी त्याच्याबरोबर वेळ घालवणे सर्वात आनंददायक होते, तो खूप साधाभोळा नवरा असल्याचे तिने म्हटले होते.