मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्यांदा अरबाज खान चढणार बोहल्यावर?, लग्नाची तारीख आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:44 IST2023-12-21T13:43:47+5:302023-12-21T13:44:25+5:30
Arbaaz Khan Second Wedding : अभिनेता अरबाज खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर तो मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर आता लवकरच तो दुसरं लग्न करणार असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे.

मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्यांदा अरबाज खान चढणार बोहल्यावर?, लग्नाची तारीख आली समोर
अभिनेता अरबाज खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर तो मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर आता लवकरच तो दुसरं लग्न करणार असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरबाज खान मेकअप आर्टिस्ट शुरा खानला डेट करतो आहे आणि लवकरच तो तिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अरबाज खान २४ डिसेंबरला पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. तो २४ डिसेंबरला शौर खानसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र उपस्थित राहणार आहेत. लग्न मुंबईतच होणार आहे. शुरा आणि अरबाज यांची भेट पटना शुक्ला चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. अरबाजच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अरबाज खानने यापूर्वी अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले होते. मलायका आणि अरबाजचे लग्न १२ डिसेंबर १९९८ रोजी झाले होते. पण त्यांचे नाते काही फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या १९ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. मलायका आणि अरबाजला एक मुलगाही आहे. मलायकापासून वेगळे झाल्यानंतर अरबाजने जॉर्जिया अँड्रियानीला डेट केले. काही काळापूर्वी अरबाज आणि जॉर्जिया एंड्रियानी यांनी त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
ब्रेकअपवर जॉर्जिया म्हणाली...
ब्रेकअपबद्दल जॉर्जिया म्हणाली होती की, 'आम्ही मित्र होतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. मला त्याच्याबद्दल नेहमीच भावना असतील. अरबाजचे मलायकासोबतचे नाते कधीच आमच्यात आले नाही. मला आता कोणाची गर्लफ्रेंड बनायचे नाही. हे फार काळ टिकणार नाही हे आम्हा दोघांनाही माहीत होते. हे खूप वेगळे होते.
कोण आहे शुरा खान?
शुरा खान ही बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आहे. तिने रवीना टंडन आणि तिची मुलगी राशासोबत काम केले आहे.